म्हाडाच्या आयएएस अधिकाऱ्यांच्या विश्रामगृहास विरोध !

16 Jan 2021 16:09:33

MHADA_1  H x W:



मुंबई :
म्हाडाने मध्य मुंबईतील १४ घरे मुंबईत बैठकीला उपस्थित राहणाऱ्या आयएएस अधिकाऱ्यांसाठी विश्रामगृह म्हणून राखीव ठेवले असून या घरांच्या सुशोभीकरण आणि देखभालीसाठी तीन कोटीचा खर्च करण्यात येणार आहे यास राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते गणेश आडीवरेकर यांनी विरोध केला असून ही घरे उपकर प्राप्त इमारतीतील रहिवाश्यानाच मिळायला हवी यासाठी न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले.

म्हाडाने मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील पुनर्विकसीत उपकर प्राप्त इमारत ताडदेव येथील वेलिग्टन व्ह्यू इमारतीतील ६ घरे आणि माटुंग्यातील माटुंगा वास्तू इमारती मधील ८ घरे ही मुंबईत बैठकीला उपस्थित राहणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवेतील ( आयएएस ) अधिकाऱ्यांच्या विश्रामगृह निवास व्यवस्था करण्यासाठीचा निर्णय तीन वर्षापूर्वी घेतला.तेंव्हा पासून ही घरे अशीच पडून आहेत आता या घरांना विश्रामगृह बनविण्यासाठी सुशोभीकरण व देखभाल यासाठी निविदा काढण्यात येणार असून ही निविदा तीन कोटी रुपये खर्चाची असल्याची माहिती आडीवरेकर यांनी दिली आहे ही घरे उपकरप्राप्त इमारतीच्या मास्टर लिस्ट वरील रहिवाश्यासाठी राखीव असून त्यांनाच ही घरे मिळावी यासाठी म्हाडा विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे आडीवरेकर यांनी सांगितले. यावरून म्हाडाच्या मास्टरलिस्ट वरील रहिवाश्याना घरे मिळण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे स्पष्ट होत आहे
Powered By Sangraha 9.0