देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2021
Total Views |

pm_1  H x W: 0


भारताची लसीकरण मोहीम म्हणजे प्राणाची आहुती दिलेल्या कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली- पंतप्रधान मोदी


नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच ते म्हणाले,"या दिवशाची संपूर्ण देशवासियांनी वाट पाहिली. कोरोनाची लस कधी येणार हा प्रत्येक देशवासियांना प्रश्न पडला होता. आजपासून भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरु होईल. मी सर्व देशवासियांना यासाठी शुभेच्छा देतो. आज ते शास्त्रज्ञ, लसीशी निगडीत लोक कौतुकास पात्र आहेत. त्यांनी कुठला सण पाहिला नाही. ना रात्र पाहिली ना दिवस. लस निर्माण होण्यास अनेक वर्ष लागतात. पण भारतात खूप कमी काळात दोन लसींची निर्मिती करण्यात आली आहे. अजून काही लसींचं संशोधन सुरु आहे. हे भारताचं मोठं यश म्हणावं लागेल”, अशा शब्दात मोदी यांनी लस निर्मीतीच्या कार्यात योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले.


कोरोना लसीचे दोन डोस घेणे आवश्यक असल्याचे सांगत मोदींनी लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातच आपण ३ कोटी आरोग्य सेवकांना लस देणार आहोत हे स्पष्ट केले. ते म्हणाले," दुसऱ्या टप्प्यात आपल्याला ही मोहीम ३० कोटी लोकांपर्यंत घेऊन जायची आहे. दुसऱ्या टप्प्यात वृद्ध नागरिकांना आणि फ्रन्ट लाईन कामगारांना लस दिली जाणार आहे. भारताची लसीकरण मोहीम खूप मोठी आहे. त्यामुळे ही मोहीम म्हणजे भारताच्या सामर्थ्याचं दर्शन म्हणावं लागेल. आपले शास्त्रज्ञांनी भारतीय बनावटीच्या दोन्ही लसीबाबत खात्री पटल्यानंतरच लसीच्या आपत्कालीन वापसाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांना बळी पडू नका. जगभरातील ६० टक्के बालकांना ज्या लस दिल्या जातात. त्याची निर्मिती ही भारतातच होते. त्यामुळे भारतीय बनावटीच्या कोरोना प्रतिबंधक लसही विश्वासार्ह असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी आवर्जुन सांगितले.


आत्मनिर्भर भारत


महत्वाची बाब म्हणजे भारतीय बनावटीच्या लसीची किंमत अत्यंत कमी आहे. त्या तुलनेत जगभरातील लसीच्या किमती जास्त आहेत. तसंच भारतीय बनावटीची लस ही ट्रान्सपोर्टपासून ते स्टोरेजपर्यंत भारतातील वातावरणाला पुरक आहे. ही लसच आपल्याला कोरोना विरोधातील लढ्यात विजयी करेल. संकट कितीही मोठं असेल, भारतीयांनी आपला आत्मविश्वास कधीही गमावला नाही. भारतात जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव झाला तेव्हा भारतात फक्त एक लॅब होती. पण आता भारतात २३००हून अधिक लॅब आहेत. सुरुवातीला आपण कोरोनाविषयक अनेक उपकरणांसाठी विदेशावर अवलंबून होतो. पण आज आपण त्याबाबत आत्मनिर्भर आहोत हे देखील त्यांनी सांगितले.



मृत आरोग्य कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली


“आम्ही दुसऱ्यांच्या कामी आलो, हा निस्वार्थ भाव आपल्या मनात असला पाहिजे. आज आम्ही गेल्या वर्षाकडे पाहिलं तर एक राष्ट्र म्हणून आम्ही खूप शिकलो आहोत. घरातील एखादा व्यक्ती आजारी असेल तर संपूर्ण कुटुंब त्याची सुश्रृषा करतं. पण कोरोनाने आजारी व्यक्तीलाच एकटं पाडलं. अनेक लहान बाळं आईविना रुग्णालयात उपचार घेत होते. अनेक वृद्ध नागरिक आपल्या कुटुंबाविना अनेक दिवस रुग्णालयात होते. कोरोनामुळे मृत्य पावलेल्या लोकांना आपल्या कुटुंबातील कुणी पाहू शकला नाही. कोरोनामुळे समाजात एकप्रकारचं नैराश्य पसरलं होतं. पण नैराश्याच्या या वातावरणात कुणीतरी आशा जागृत करण्याचा प्रयत्न करत होतो. अशावेळी काही लोक आपल्यासाठी त्यांचं आयुष्य संकटात टाकत होते. डॉक्टर, नर्स, अॅम्ब्युलन्स ड्रायव्हर, अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली. त्यांनी अनेक दिवस आपल्या मुला-बाळांना नातेवाईकांना पाहिलं नाही. त्यातील काही सहकारी तर घरी परतू शकले नाहीत. त्यांनी एक-एक जीव वाचवण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यामुळे सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाणारी पहिली लस म्हणजे कोरोनाकाळात मृत्यू पावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली आहे.” अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी मृत पावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

@@AUTHORINFO_V1@@