गलवान खोर्‍यातील हौतात्म्य व्यर्थ जाणार नाही!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2021
Total Views |

manoj naravane_1 &nb



लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचा चीनला इशारा




नवी दिल्ली:
“पूर्व लडाखमधील गलवान खोर्‍यामध्ये हुतात्मा झालेल्या भारतीय जवानांचे हौतात्म्य व्यर्थ जाणार नाही, हा विश्वास मी देशवासीयांना देतो. चर्चेद्वारे प्रश्न सोडविण्यावर भारताचे प्राधान्य आहे. मात्र, भारताच्या संयमाचा कोणीही अंत पाहू नये,” असा इशारा लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी चीनला शुक्रवार दि.१५ जानेवारी रोजी दिला. ‘राष्ट्रीय सेना दिना’निमित्त ते बोलत होते.


 
“गलवान खोर्‍यात हुतात्मा झालेल्या भारतीय जवानांचे हौतात्म्य व्यर्थ जाणार नाही, याची ग्वाही मी देशवासीयांना देतो. कोणताही प्रश्न चर्चा आणि राजनैतिक उपायांनी सोडविण्यासाठी भारत नेहमीच कटिबद्ध आहे. वास्तविक नियंत्रण रेषेवर चीनच्या हरकतींना भारतीय सैन्याने सडेतोड उत्तर दिले आहे आणि यापुढेही ते दिले जाईल. मात्र, भारतास डिवचण्याचा प्रयत्न केल्यास त्यास त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल. त्यामुळे भारताच्या संयमाचा कोणीही अंत पाहू नये” असा इशारा लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी चीनला दिला. पाकिस्तानने अद्यापही दहशतवाद्यांना आश्रय आणि मदत देणे थांबविले नसल्याचे जनरल नरवणे यांनी सांगितले.



तसेच ते पुढे म्हणाले, “दहशतवादी कारवाया करणे ही पाकची सवयच आहे. ३०० ते ४०० दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत आहेत. पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्याचप्रमाणे ड्रोन आणि भुयारांच्या माध्यमातून शस्त्र, अमली पदार्थांची तस्करीही वाढली आहे. मात्र, दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या भारतीय सैन्याच्या प्रयत्नांना मोठे यश येत आहे. विविध दहशतवादविरोधी कारवायांमध्ये २०० पेक्षा जास्त अतिरेक्यांना संपवण्यात आले आहे.” असे जनरल नरवणे यांनी यावेळी सांगितले.




@@AUTHORINFO_V1@@