ममता दीदींच्या पक्षाचे आंतरिक वाद चव्हाट्यावर; ४१ आमदार भाजपच्या संपर्कात

15 Jan 2021 15:06:35
mamata banerjee_1 &n

अनेक आमदार नाराज 

मुंबई - पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूका जवळ येत असताना ममता बनर्जींच्या तृणमुल काॅंग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत. पक्षाच्या आमदार आणि अभिनेत्री शताब्दी राॅय या ममता दीदींच्या कार्यशैलीवर नाराज आहेत. अशावेळी पश्चिम बंगालमधील भाजपचे महासचिव आणि विधानसभा निवडणुकी प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी तृणमुलचे ४१ आमदार संपर्कात असल्याचा दावा केला आहे. 
 
 
 
तृणमुल पक्षाच्या आमदार आणि अभिनेत्री शताब्दी रॉय यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपले दुख: व्यक्त करुन पक्षामधील वागणूकीबाबत राग व्यक्त केला. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले, “माझे निर्वाचन क्षेत्र बीरभूममधील लोकांचे २०२१ हे वर्ष खूप चांगले आणि निरोगी असूदेत. पक्षाबरोबर माझे घनिष्ठ संबंध राहिले आहेत. परंतु, गेल्या काही दिवसांपासून लोक मला सतत विचारत आहेत की, मी पक्षाच्या कार्यक्रमामध्ये का दिसत पाहत नाही? मी स्पष्ट करतो की, मला लोकांमध्ये राहणे आवडते. मात्र, अनेक लोकांना मी तसे करावे असे वाटत नाही." या लोकांच्या नावाचा खुलासा राॅय़ यांनी केला नसला तरी, १६ जानेवारी दुपारी दोन वाजता त्या आपले पुढचे पाऊल काय असेल याविषयी स्पष्टता देणार आहेत. 
 
 
विजयवर्गीय म्हणाले की, "बंगालमधून ममता बनर्जींची सत्ता जाऊ शकते. तृणमुल पक्षातील ४१ आमदार आमच्या संपर्कात आहे. ज्यांना पक्ष बदलायचा आहे. त्यांना आम्ही पक्षात सामील करुन घेतल्यास ममता दीदींचे सरकार कधीही कोसळू शकते.
 
 
Powered By Sangraha 9.0