भव्य श्रीराम मंदिर निर्माणासाठी राष्ट्रपतींकडून ५ लाखांचा निधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2021
Total Views |
ram mandir _1  


निधी समर्पण मोहिमेची सुरुवात 

मुंबई - अयोध्येतील भगवान श्रीराम मंदिर निर्माणासाठी निधी समर्पण मोहीमेची सुरुवात आजपासून झाली. या मोहिमेच्या पहिल्या दिवशी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पाच लाख रुपये देऊन भव्य राम मंदिराच्या निर्माण कार्याला शुभेच्छा दिल्या. जागतिक हिन्दू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि श्रीराम जन्मभूमी तिर्थी क्षेत्रीय ट्रस्टच्या पुनर्निधी मंडळाच्या प्रतिनिधींनी या अभियानाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींची भेट घेतली. 
 
 
अयोद्धेतील भव्य श्रीराम मंदिर निर्माणासाठी निधी समर्पणाच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. ही मोहिम पुढील दीड महिने चालणार आहे. या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी महाराज, विश्व हिंदू परिषदचे कार्याध्यक्ष आलोक कुमार, राम मंदिर निर्माण समितिचे प्रमुख नृपेन्द्र मिश्रा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत अध्यक्ष कुल भूषण आहूजा यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. निधी समर्पणाच्या मोहिमेकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जागतिक हिन्दू परिषदेचे कार्यकर्ते जवळपास पाच लाख गावांना भेट देणार आहेत. त्याव्दारे ते १२ करोड लोकांना भेटतील. याशिवाय या दोन्ही संघटनेतील पदाधिकारी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशीही भेटी घेतील. याशिवाय प्रसिद्ध व्यक्तींकडून सुद्धा निधी सहयोगाकरिता भेटीगाठी होणार आहेत. 
 
आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी महर्षि वाल्मीकी मंदिरामध्ये जाऊन महामंडलेश्वर पूज्य संत कृष्ण शाह विद्यार्थीजी महाराज यांच्याशी निधी सहयोगाकरिता संवाद साधला. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी देखील राम मंदिर निधी समर्पण मोहिमेसाठी एक लाखाचा निधी दिला आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री प्रणीता सुभाष यांनी ट्वीट करुन लोकांना निधी सहयोगाकरिता आवाहन केले आहे. त्यांनी देखील एक लाख रुपायांचा निधी राम मंदिर निर्माणासाठी दिला आहे.
@@AUTHORINFO_V1@@