कार्यक्रमात सरस्वतीची पूजा केल्याने कवी यशवंत मनोहरांनी पुरस्कार नाकारला

15 Jan 2021 12:58:27

poet yashwant manohar _1&

विदर्भ साहित्य संमेलनातील घटना 

मुंबई - विदर्भ साहित्य संघाच्या पुरस्कारात सरस्वीतीच्या प्रतिमेची पूजा केल्याने कवी यशवंत मनोहर यांनी पुरस्कार नाकारला. त्यांनी संघाला पत्र लिहून सरस्वती प्रतिमा न ठेवण्याची मागणी केली होती. मात्र, साहित्य संघाने त्यांची ही मागणी मान्य न केल्याने मनोहर काल पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात उपस्थित नव्हते. 
 
 
विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार कवी यशवंत मनोहर यांना जाहीर झाला होता. साहित्य विश्वातील त्यांची कामगिरी लक्षात घेऊनच संघाने हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार होते. मात्र, पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी मनोहर हे साहित्य संघाशी पत्रव्यवहारच्या माध्यमातून संपर्कात होते. त्यांनी पुरस्कार सोहळ्यात सरस्वतीची प्रतिमा किंवा पूजा न करण्याची अट संघासमोर ठेवली होती. हा कार्यक्रम साहित्य विश्वाशी संबंधित असल्याने त्याठिकाणी धार्मिक प्रतिक दिसू नये म्हणून मनोहरांनी आग्रह धरला होता. 
 
 
 
मात्र, मनोहरांची ही अट साहित्य संघाने नाकारली. साहित्य आणि कला विश्वातील लोकांसाठी सरस्वती ही आराध्य आहे. त्यामुळे परंपरेप्रमाणे सरस्वतीची पूजा करुनच कार्यक्रमाला सुरुवात होईल, अशी भूमिका आयोजकांनी घेतली. त्यामुळे नाराज झालेल्या मनोहरांनी हा पुरस्कार नाकारला. तसे पत्र त्यांनी प्रसिद्ध केले. त्यामुळे काल नागपूरमध्ये पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यासाठी ते उपस्थित होते. 
Powered By Sangraha 9.0