मुंबई : राज्य अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून ड्रग्स प्रकरणी चौकशी नंतर अटक करण्यात आली आहे.यावर नवाब मलिक यांनी ट्विट करत, कायदा त्याचं काम करेल आणि न्याय नक्की मिळेल असं ट्विट करत या विषयावर भाष्य केले आहे.
नवाब मलिक यांचे जावई समीर खानला अमली पदार्थांचा व्यवहार केल्याप्रकरणी चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. यावेळी तो ड्रग्जचे सेवनदेखील करत असून ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आलेल्या करण सजनानी आणि समीर खानमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचा व्यवहार झाल्याची माहिती देखील एनसीबीला मिळाली होती .त्यामुळे काल एनसीबीने खानला चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीपूर्वी फक्त २० हजारांचा व्यवहार झाल्याची माहिती एनसीबीकडे होती. मात्र, काल अधिक चौकशी केली असता,यापेक्षा मोठा व्यवहार असल्याची माहिती उघड झाली आहे. त्यामुळे समीर खानला काल एनसीबीने अटक केली .आज त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे.
यावर आज अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत म्हणाले की, कोणत्याही भेदभावाशिवाय हा नियम सगळ्यांना लागू झाला पाहिजे. कायदा त्याचं काम करेल आणि न्याय नक्की मिळेल. मला न्यायसंस्थेविषयी पूर्ण आदर आणि विश्वास आहे,असे ट्विट मलिक यांनी केले आहे. यावर भाजपचे नेते किरीट सौमेय्या यांनी कालच ट्विट करून मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मालिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो एनसीबीने अटक केली आहे. आता सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा दिला पाहिजे असे म्हटले आहे.