तुझसे नाराज नहीं! : आव्हाड-सामंतांमध्ये धुसफूस

    दिनांक  13-Jan-2021 18:07:26
|

avhad and samant_1 &
 
 
 
मुंबई :  माजी म्हाडाचे अध्यक्ष आणि सध्याचे तंत्र आणि उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कल्पना न देताच म्हाडाबाबत बैठक घेणार असल्याने, त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये वाद सुरू असल्याची माहिती मिळत आहे. ही नाराजी आव्हाड यांनी जाहीररित्या व्यक्त केली नसली, तरी महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्गत वादाची कुजबुज आहे.
 
 
महाविकास आघाडी सरकारच्या अंतर्गत वाद आणि नाराजी काही राज्यातील जनतेला नवीन नाही. काँग्रेस विरुद्ध शिवसेना तरी कधी शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी नाराजीची मालिका सुरूच आहे.वेगवेगळ्या तीन विचारांच्या पक्षांनी फक्त सत्तेसाठी सर्व बाजूला ठेऊन आघाडी करत सरकार बनवले. मात्र, त्यांच्यातले वाद सरकार स्थापन झाल्यापासून काही नेते उघड बोलत आहेत तर काही सरकार टिकवण्यासाठी दबक्या आवाजात पण राज्यात विकास काम करणार की हे अंतर्गत वाद किती दिवस चालणार असा सर्वसामान्य याना प्रश्न पडलाय.
 
 
 
औरंगाबादचे नामांतर असो वा, एखादा निर्णय असो एकमेकांच्या विरोधात सरकारमधील नेत्यांमध्ये नाराजी दिसत आहेत . त्यातच काल म्हाडाचे माजी अध्यक्ष उदय सामंत यांनी म्हाडा संदर्भात सध्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना न विचारता, १५ तारखेला रखडलेल्या प्रकल्पांबाबत बैठक बोलावली आहे. त्यामुळे माझ्या अखत्यारीत असलेल्या विषयी सामंत यांनी का बैठक घेतली व मला कळवलं देखील नाही म्हणून जितेंद्र आव्हाड हे नाराज झाले आहेत. त्यांनी सामंत यांच्या जवळ उघड उघड नाराजी न व्यक्त करता, आपल्याच पक्षातील वरिष्ठांशी बोलून नाराजी व्यक्त केली आहे.त्यामुळे महाविकास आघाडी नाराजचीमुळे बिघाडी असल्याचे समोर येत आहे. यासंदर्भात उदय सामंत आणि जितेंद्रा आव्हाड यांच्याशी संवाद साधला असता , त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.