श्रीराम मंदिर निधीसंकलनात काँग्रेसचीही उडी

    दिनांक  13-Jan-2021 12:20:57
|

shriram mandir_1 &nb
भोपाळ :
अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माणाचे कार्याने वेग घेतला असून हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपने निधी संकलनासाठी मोहीम हाती घेतली आहे. मात्र आता श्रीराम मंदिरासाठी काँग्रेसनेसुद्धा निधी उभारणीच्या कार्यक्रमात स्वतंत्रपणे उडी घेतली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये राम मंदिर उभारणीसाठी जमेल तेवढा निधी देण्याची विनंती करणारे पोस्टर्स राजीव गाधींच्या फोटोसह झळकले आहेत.मध्य प्रदेशमध्ये त्या आशयाचे पोस्टर्स झळकले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या जवळचे म्हटले जाणारे आमदार पी. सी. शर्मा यांनी निधी उभारणी सुरु केली आहे. त्यांनी भोपाळमध्ये तशा आशयाचे पोस्टर्स लावले असून त्यामध्ये राम मंदिराची निर्मिती करणे हे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे स्वप्न होते. त्यासाठी आपण निधी द्यावा अशा आशयाचे पोस्टर सध्या झळकत आहेत. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचा १९८९ साली राजीव गांधी अयोध्या येथील राम मंदिराचे भूमिपूजन करताना दिसत आहेत. पोस्टरमध्ये राम मंदिर ट्रस्टचा बँक अकाऊंट नंबरसुद्धा दिलेला आहे. या अकऊंटमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी निधी द्यावा करावे असे आवाहन पी. सी शर्मा यांनी पोस्टरच्या माध्यमातून केला आहे. पोस्टरवर ‘राजीव गांधी जी का सपना हो रहा साकार राम मंदिर ले रहा आकार’, ‘मंदिर निर्माण में हाथ बढ़ाएं, आओ प्रभु राम का घर सजाएं.’ असे हिंदीमध्ये लिहिलेले आहे.


दरम्यान, यापूर्वी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीसुद्धा राम मंदिर निर्माणाचे स्वागत केले आहे. त्यांच्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनीसुद्धा राम मंदिर निर्माणाचे स्वागत करत राजीव गांधींची अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्याची इच्छा होती, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी निधी जमा करण्याचे काम सुरु केले होते.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.