श्रीराम मंदिर निर्मितीसाठी ३५ कोटींचा निधी जमा करण्याचे उद्दिष्ट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2021
Total Views |

VHP_1  H x W: 0
 
 
 
डोंबिवली : श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्रन्यास द्वारा श्री राम जन्मभूमी स्थानी भव्य मंदिर उभारण्यात येणार असून त्यासाठी निधी संकलन करण्यात येणार आहे. या निधी संकलन अभियानात संपूर्ण देशभर संपूर्ण संघ परिवार योगदान देणार आहे. कल्याण विभागामधून या अभियानाच्या माध्यमातून ३५ कोटीचा निधी जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेतर्फे देण्यात आली आहे.
 
 
या निधी संकलन अभियानासाठी देशभर जनसंपर्क करून निधी संकलित करण्यात येणार आहे. संघ रचनेप्रमाणो कल्याण विभागातील चार जिल्हे कल्याण, भिवंडी, अंबरनाथ व पालघर असे चारही जिल्हयात संस्थेचे कार्यालय उघडण्यात आले आहे. नगर, तालुका, मंडळ, वस्त्या, प्रखंड, खंड या रचनेत संघ परिवाराच्या सर्व कार्यकत्र्यानी जनसंपर्क करण्याचे व प्रत्येक व्यक्तीकडून मंदिरासाठी काही ना काही रक्कम मिळावावी. एखादी व्यक्ती १० रू., १०० रू. आणि एक हजार रू. चे कुपन घेऊ शकते. तसेच दोन हजारांपेक्षा जास्त रक्कमेसाठी पावती पुस्तकांद्वारे धनराशी देऊ शकतात अशी योजना आखण्यात आली आहे. कल्याण विभागातील एकूण १६ लाख ६९ हजार कुटुंबसंख्या आणि पन्नास लाख व्यक्तीर्पयत पोहोचणार आहोत. त्यांच्याशी संपर्क करून निधी संकलन करण्यात येणार आहे.
 
 
कल्याण विभागातून सात ते आठ लाख रूपये जमा करण्याचा मानस आहे. हे जन अभियान जगातील सर्वात मोठा जन संपर्क अभियान असणार आहे. हे अभियान १५ जानेवारी ते २० फेब्रुवारी या कालवधीत घेण्यात येणार आहे. या अभियानास सर्व भारतीयांनी उत्स्फु र्तपणो प्रतिसाद देऊन जास्तीत जास्त निधी श्रीराम मंदिराकरिता समर्पित करावा असे आवाहान विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आले आहे. यावेळी विश्व हिंदू परिषद कल्याण विभाग मंत्री विभाग अभियान प्रमुख अॅड मनोजजी रायचा, विश्व हिंदू परिषद कल्याण जिल्हा मंत्री अभिषेक गोडबोले, अभियानप्रमुख कल्याण जिल्हा रोशन जगताप, मातृशक्ती प्रमुख कल्याण जिल्हा अॅड सुधा जोशी उपस्थित होते.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@