भारत-पाक सीमेवर सापडले भुयार

    दिनांक  13-Jan-2021 20:25:01
|
tunnel _1  H xप्रजासत्ताकदिनामुळे सैन्यदल सर्तकनवी दिल्ली : प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर जन्मू-काश्मीरच्या कठुआयेथील आंतरराष्ट्रीय सीमेवर एक भुयार सापडले आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सर्तक झाले आहे. मात्र, या भोगद्याची पाहणी केल्यानंतर तो अलीकडच्या काळात वापरला नसल्याते समोर आले आहे. 

कठुआमधील हिरानगर सेक्टरमध्ये भारत-पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ जमिनीखाली एक भुयार सापडले. प्रजासत्ताक दिनासाठी काही दिवस राहिले आहेत. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय सीमेवर दहशतवादाशी संबंधित हालचाली दिसल्याने सैन्य दल सर्तक झाले आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर सापडलेले हे भुयार जवळपास १५० मीटर लांब आहे. 


योग्य इंजिनिअरिंग पद्धतींचा वापर करुन हे भुयार तयार करण्यात आल्याचे दिसते. पाकिस्तान हे भुयार दहशतवाद्यांना भारतात प्रवेश करण्यासाठी तयार केल्याचा अंदाज आहे. मात्र, हे भुयार गेल्या काही कालावधीत उपयोगात आलेले नसल्याचे बीएसएफचे आईजी एन.एस.जामवाल यांनी सांगितले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.