भविष्य घडवायचे असेल तर कष्टाविना पर्याय नाही : डॉ. विजय सूर्यवंशी

    दिनांक  13-Jan-2021 19:02:07
|
patil news_1  H 


 
 

कल्याण : विद्यार्थ्यांना आपले भवितव्य घडवायचे असेल तर कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. विविध कला जोपासत असताना खेळ खेळताना गुणवत्ता कमी झाली तरी हरकत नाही परंतु आपले ध्येय सोडायचे नाही, असे मत कडोंमपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले आहे.
 
 
  
ठाणे जिल्हा विद्या सेवक सहकारी शिक्षकांची पतपेढीतर्फे सभासदांचे पाल्य व सेवानिवृत्त सभासदांचा गुणगौरव केला जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण येथील पतपेढीच्या मुख्य शाखेत प्राथमिक स्वरुपात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत छोटेखानी साजरा झाला. यावेळी सूर्यवंशी बोलत होते. ठाणे पालघर जिल्ह्यात सात हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सभासद कार्यरत आहेत .पतसंस्थेत गेल्या ३३ वर्षांपासून हा गुणगौरव केला जात आहे. दरवर्षी हा कार्यक्र म मोठ्या प्रमाणात नाट्यमंदिरात असतो परंतु यावर्षी कोरोना च्या पार्श्वभूमीवर छोटेखानी करण्यात आला.
 
 
 
 
डॉ. सूर्यवंशी म्हणाले, "मी स्वत: फुटबॉल आणि बास्केटबॉल खूप खेळायचो. बारावीला कमी गुण मिळाले परंतु पुढे मात्न ध्येय गाठले. पालकांनी विनाकारण आपल्या मुलांकडून जास्त टक्केवारीची अपेक्षा ठेवू नये. मुले आपल्या क्षमतेनुसार गुणवत्ता प्राप्त करतात. पतसंस्थेमार्फत गुणगौरव केल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे मला कौतुक आहे. या विद्यार्थ्यांनी पुढे ही असेच यश मिळवावे. खरंतर कोरोना काळात मला शिक्षकांची साथ मिळाली. घरोघरी जाऊन कोरोना सर्वेक्षणाच्या कामासह शिक्षक, इंजिनिअर यांनी डॉक्टरांची भूमिका बजावली. आपण केलेले काम अभिमानास्पद आहे असेही ते म्हणाले.


 
 
 
पतसंस्थेचे अध्यक्ष सुधीर घागस यांनी आपल्या भाषणातून सभासदांच्या हिताच्या विविध योजनांची माहिती दिली तसेच एक जानेवारी पासून गृहकर्ज २५ लाख रुपये केलेले आहे याचा फायदा सभासदांनी घ्यावा, असेही सांगितले. संचालक तथा कार्यक्रम समिती प्रमुख गुलाबराव पाटील यांनी गुणवंत पाल्य व सेवानिवृत्त सभासदांनी आपल्या पतसंस्थेच्या शाखेत जाऊन आपली भेटवस्तू स्वीकारण्याचे आव्हान केले. 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.