पवारांची सोनुने घेतली भेट

    दिनांक  13-Jan-2021 17:21:00
|


sonu sood and sharad pawa


मुंबई: अभिनेता सोनू सूद समाज सेवा असो वा काहींना काही विषयांवरून नेहमीच चर्चेत असतो. त्यात आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार आणि सोनू सूद यांच्या भेट ही सदिच्छा भेट आहे असं म्हटलं जात आहे , पण काही दिवसांपूर्वीच सोनू सूद विरोधात मुंबई महापालिकेने अनधिकृत बांधकामाच प्रकरण कोर्टात सुरू आहे यासंदर्भात भेट घेतली असल्याची चर्चाही एका गोटात आहे.

सोनू सूद याचा बेकायदा बांधकामाप्रकरणी नोटीस महापालिकेने सोनूला दिल्यानंतर सोनूने कोर्टात पालिकेला आव्हान दिले, यानंतर महापालिकेने कोर्टात सोनूला नोटीस वारंवार बजावून आणि कारवाई करूनही अभिनेता सोनू सूदने कायद्याचे उल्लंघन करणे थांबवले नाही. त्यामुळे तो वारंवार कायदे मोडणारा गुन्हेगारच आहे, असा दावा पालिकेने मंगळवारी उच्च न्यायालयात केला होता. तसेच सोनूला करवाईपासून कोणताही दिलासा देऊ नये, अशी मागणीही पुराव्यानिशी केली. पालिकेच्या कारवाईविरोधात सोनूने उच्च न्यायालयात आता धाव घेतली असून आपण कोणत्याही प्रकारचे बेकायदा बांधकाम केलेले नाही, असा दावा त्याने केलाय आहे. तसेच पालिकेने कारवाईबाबत बजावलेली नोटीस रद्द करण्याची मागणी केली आहे.त्यामुळेच राज्यात सत्तेत असलेल्या तीन पक्षांतील महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा यांना भेटून या प्रकरणी काही सामंजस्य होतय का यासाठी पवारांना सोनू भेटले अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.