आता मोदी सरकारपुढे अमेरीकेतील कोरोनाला रोखण्याचं आव्हान

13 Jan 2021 17:30:15

new strain_1  H



गेल्या १५ दिवसांत रुग्णांच्या आकड्याची शंभरी पार


मुंबई: भारतात एकिकडे कोरोना लसीकरण सुरू होणार असल्याने उत्साहाचे वातावरण आहे. मात्र दुसरीकडे कोरोनाच्या न्यू स्ट्रेनच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे आणि त्यामुळे चिंतासुद्धा व्यक्त केली जात आहे. भारतात कोरोनाच्या न्यू स्ट्रेनच्या रुग्णांची संख्या आता वाढू लागली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं बुधवारी दिलेल्या माहितीनुसार अमेरीकेत आढळलेल्या न्यू स्ट्रेनचे भारतात १०२ रुग्ण आढळून आले आहेत.


या सर्व रुग्णांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. सगळ्यांवर उपचार सुरू आहेत आणि या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचाही शोध घेत असल्याचे सरकारने सांगितले आहे. अमेरीकेमध्ये आढळून आलेला 'न्यू स्ट्रेन' हा विषाणू संसर्गजन्य आहे. ६० टक्क्यांपेक्षा अधिक वेगाने पसरतो. या न्यू स्ट्रेनचे महाराष्ट्रात एकूण ११ रुग्ण आहेत. मुंबई, पिंपरी-चिंचवडमध्ये प्रत्येकी ३, पुण्यात २ आणि मीरा-भाईंदरमध्ये १ रुग्ण आढळून आलेला आहे. या रुग्णांवर मुंबईत उपचार सुरू आहेत. शिवाय दोन रुग्णांना डिस्चार्जही देण्यात आला आहे.



संपूर्ण जगाला पुन्हा एकदा संकट टाकू पाहणारा हा विषाणू भारतासह अनेक देशांमध्ये आढळून आला आहे. डेन्मार्क, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, इटली, स्वीडन, फ्रान्स, स्पेन, स्वित्झर्लंड, जर्मनी, कॅनडा, जपान, लेबनॉन, सिंगापूर या देशांचा समावेश आहे.




Powered By Sangraha 9.0