वाजले की बारा...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2021
Total Views |
dhananjay munde_1 &n




धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कारप्रकरणी पोलिसांत तक्रार



मुंबई: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्कारप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधित महिलेने ओशिवरा येथील पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली असून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर महाविकास आघाडीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. परंतु, “धनंजय मुंडे यांनी यावर आम्ही परस्पर सहमतीने संबंधांत होतो, माझ्या विरुद्ध होणारे आरोप हे सर्व खोटे आहेत,” अशी सारवासारव माध्यमांवर आपली प्रतिक्रिया देत केली आहे.
 
 
संबंधित महिलेने सरकारमधील मंत्री असणारे धनंजय मुंडे यांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याबाबत विविध समाजमाध्यमांवर त्यांनी संदेशही प्रसारित केले असून सरकारने मुंडे यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुंबई पोलिसांकडून महिलेचा तक्रारअर्जही स्वीकारण्यात आला आहे.
  


२००६ पासून आपल्यावर अत्याचार करण्यात येत असल्याचे महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले असून पुढे बॉलीवूडमध्ये चांगली संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. तसेच याचे व्हिडिओ काढून धमकावल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. यासंदर्भात ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी दयानंद बांगर यांनी माहिती दिली की, तक्रार अर्ज आलेला आहे. पुढे चौकशी व अधिक तपास सुरू आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
 


 
मुंडेंना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही
मुंडे दोषमुक्त होईपर्यंत त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही. मुंडे हे सांगतात, आपल्या दोन पत्नी आहेत. पण, आता एका महिलेने त्यांच्यावर आरोप केला आहे. म्हणून जोपर्यंत त्यांची यातून मुक्तता होत नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळात राहण्याचा त्यांना अधिकार नाही.
- किरीट सोमय्या, माजी खासदार


मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा
पीडित महिला तक्रार करत असेल, तर कायद्यानुसार चौकशी व्हायला हवी आणि न्याय मिळायला हवा. मंत्र्यांविरोधात अशा प्रकारे तक्रार होणे ही गंभीर बाब आहे. या संपूर्ण प्रकरणाची नि:पक्ष चौकशी होईपर्यंत मुंडे यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करण्यात यावी.
- अतुल भातखळकर, प्रभारी, भाजप, मुंबई


आरोप पूर्णपणे खोटे
मंगळवारपासून समाजमाध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्रे प्रसारित होत असल्याचे तसेच माध्यमांमधून माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो. हे सर्व आरोप खोटे असून माझी बदनामी करणारे आणि मला ‘ब्लॅकमेल’ करणारे आहेत.
- धनंजय मुंडे, सामाजिक न्यायमंत्री, महाराष्ट्र







@@AUTHORINFO_V1@@