मंत्रालयात पुन्हा शॉर्टसर्किट, दुर्घटना टळली

12 Jan 2021 18:18:34

mantralay_1  H  


 
 

अतिभार आल्याने अनेक वेळा विद्युत पुरवठा खंडित होतो


 

मुंबई : राज्याची सूत्र ज्या मंत्रालयातून हलवली जातात त्या ठिकाणी पुन्हा एकदा दुर्घटना होता होता टळली आहे. आज ट्रान्सफॉर्मर जळाल्याने काही वेळासाठी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. वेळीच सर्व स्विच बंद केल्याने मोठा धोका अनर्थ टळला आहे. मंत्रालयात आज ट्रान्सफॉर्मर जळाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता.

 
 
 
यामुळे एकनाथ शिंदेसह अनेक मंत्र्यांची दालने अंधारात होती. लाईट नसल्याने अनेक विभागाची कामे देखील खोळंबली होती . मंत्रालयाच्या जुन्या अनेक्स इमारतीच्या चौथ्या मजल्यावर हे शॉर्ट सर्किट झाल होतं. यामुळे येथील ट्रान्सफॉर्मर जळाल्याने वायरिंग जळून विद्युत पुरवठा खंडित झाला होता. युद्धपातळीवर याचे दुरुस्तीचे काम करून अखेर विद्युतपुरवठा सुरळीत करण्यात आले आहे.
 
 
 

मागील वर्षी 30 मार्च 2020 रोजी व 2012 रोजी मंत्रालयात शॉर्ट सर्किटमुळे आग लागून मोठं नुकसान झालं होतं. आज शॉर्ट सर्किट होऊन हा अनर्थ टळला आहे. पण मंत्रालयात वायरिंग शॉर्ट सर्किट तसेच ट्रान्सफॉर्मरवर अतिभार आल्याने अनेक वेळा विद्युत पुरवठा खंडित होतो. त्यामुळे हजारो लोकं आपली काम घेऊन मंत्रालयात येतात आणि हे असं होणं राज्याचा दृष्टीने फार गंभीर आहे .त्यामुळे मंत्रालयातील विद्युत व्यवस्थेकडे नीट लक्ष देणे गरजेचे असल्याचे चित्र सध्या आहे.

 
Powered By Sangraha 9.0