मुंबईतील 'मुच्छड पानवाला'वरील कारवाईने खळबळ !

12 Jan 2021 12:41:41

Mucchad Paanwala_1 &
 
 
 
मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने प्रसिद्ध मुच्छड पानवाला उर्फ जयशंकर तिवारी याला अटक केली आहे. मुंबईतल्या केम्स कॉर्नरला त्याचे पानाचे दुकान आहे. काही दिवसांपूर्वी एनसीबीकडून करण सजनाणी या ब्रिटिश अनिवासी भारतीयाला अमली पदार्थ तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली होती. या बरोबर अभिनेत्री दिया मिर्झा हिची माजी मॅनेजर राहिला फर्निचर हीलाही अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशी नंतर एनसीबीने मुच्छड पानवाला याला अटक केली आहे. पानवाला याचे बॉलिवूडमधील मोठ्या हस्तीं बरोबर चांगले संबध आहेत.
 
 
 
मुच्छड पानवालाचे खरे नाव राम कुमार जय शंकर तिवारी असून १९७०च्या दशकामध्ये मुंबईत आल्यानंतर त्याने त्याच्या वडिलांचा पान बनवण्याचा व्यवसाय सुरू ठेवला होता. मात्र यामध्ये प्रगती करत त्याने बॉलिवूडमधील सेलिब्रेटी व उच्चभ्रू वस्तीतील नागरिकांच्या संपर्कात राहून स्वतःचा व्यवसाय पसरवला होता. दरम्यान, मुंबईतल्या वेगवेगळ्या परिसरातील उच्चभ्रू वस्ती व बॉलिवूडमधील कलाकारांसोबत मुच्छड पानवाला याची चांगली ओळख आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0