महाराष्ट्रात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव; या जिल्ह्यात आढळले संक्रमित पक्षी

11 Jan 2021 11:17:46

bird flue_1  H

राज्य सरकार सर्तक 

मुंबई (प्रतिनिधी) - राज्यात 'एव्हीयन इन्फ्लूएन्झा' म्हणजेच 'बर्ड फ्लू'चा शिरकाव झाला आहे. परभणीच्या मुरुंबा गावात 800 पेक्षा अधिक कोंबड्यांच्या मृत्यू झाला आहे. या कोंबड्यांची 'बर्ड फ्लू'ची चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. याशिवाय बीड आणि लातूर मधील अहवाल अजूनही प्रतिक्षेत आहेत. 
 
 
देशातील सहा राज्यांमधून 'बर्ड फ्लू'ची प्रकरणे समोर आलेली असतानाच आता महाराष्ट्रातही 'बर्ड फ्लू'चा शिरकाव झाला आहे. परभणीच्या मुरुंबा गावातील कुक्कुटपालन प्रकल्पातील 800 हून अधिक कोंबड्या दोन दिवसांपूर्वी अज्ञात रोगाने मृत्यू झाला होता. जिल्हा प्रशासन, पशुसंवर्धन विभागाने तत्काळ गावात धाव घेऊन उपायोजना करित पक्षांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. तिथून हे नमुने भोपाळ येथील प्रयोग शाळेत पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल रविवारी रात्री उशिरा जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला. या अहवालाच्या माध्यामातून कोंबड्या 'H5N1 इन्फ्लूएन्झा व्हायरस'ने संक्रमित झाल्याने दगावल्या असल्याचे समोर आले आहे. यामुळे परभणीतील घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने तत्काळ पावले उचलायला सुरुवात केली आहे. 
 
 
मुरुंबा गाव परिसरातील 1 किलोमीटर मधील पाळीव पक्षी नष्ट केले जाणार आहेत. याशिवाय 10 किलोमीटरच्या परिसरात सर्व प्रकारच्या पक्ष्यांची ने-आण, खरेदी-विक्री करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. गावातील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी दिली आहे. दरम्यान जिल्ह्यात कुठेही अशा प्रकारच्या घटना घडल्या तर तत्काळ पशुसंवर्धन विभागाला कळवण्याचे आवाहनही प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. सद्यस्थितीत हिमाचल प्रदेशमधील 4 हजार, 700, हरियाणातील 4 लाख, 23 हजार, राजस्थानमधील 2 हजार, 166, गुजरातमधील 55, मध्यप्रदेशातील 94 आणि केरळमधील 98 हजार पक्षी ’बर्ड फ्लू’ने मृत्युमूखी पडले आहेत. या पार्श्वभूमीवर आसाम, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्याने दुसर्‍या राज्यांमधून आयात होणार्‍या कोंबड्या आणि बदकांच्या व्यापारावर रोख लावली आहे.



’बर्ड फ्लू’च्या व्हायरस विषयी
पक्ष्यांमध्ये आढळणार्‍या फ्लूचे म्हणजेच ’बर्ड फ्लू’चे अनेक उपप्रकार आहेत. त्यातील ’क’ म्हणजे ’हेमाग्युलेटीन’  आणि ’छ’ म्हणजे ’न्यूरामिनीडिज’  हे दोन्ही या विषाणूचे ’प्रोटिन स्ट्रेन’ आहेत. यांच्या उपप्रकारांना क्रमांक दिलेले आहेत. ’क’ म्हणजेच ’हेमाग्युलेटीन’चे 18 उपप्रकार आहेत, तर ’छ’ म्हणजेच ’न्यूरामिनीडिज’चे 11 उपप्रकार आहेत. यातील फक्त क5, क7 आणि क1 हाच स्ट्रेन माणसाच्या मृत्यूचे कारण ठरु शकतो. त्यामुळे ’क5छ1’ हा माणसांसाठी अधिक धोकादायक मानला जातो. यामधील ’क17छ10’ आणि ’क18छ11’ हे फक्त वटवाघुळांमध्येच आढळतात. बाकी पक्ष्यांमध्ये याचा प्रसार होत नाही.


 
Powered By Sangraha 9.0