चीनमध्ये सापडला कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने बाधित पहिला रुग्ण

01 Jan 2021 12:06:07


china _1  H x W



वर्षाभरापूर्वी चीनमधून कोरोना संक्रमणाला सुरुवात 


चीन - कोरोना प्रादुर्भावाचा हाॅटस्पाॅट ठरलेल्या चीनमध्ये नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे संक्रमित झालेला पहिला रुग्ण सापडला. चायनिज सेंटर फाॅर डिसिज कंट्रोल अॅण्ड प्रिवेन्शनने (सीडीसी) ही माहिती प्रसिद्ध केली आहे. वर्षभरापूर्वी चीनमधील वुहान प्रातांमधून कोरोना व्हायरसचा प्रसार संपूर्ण चीन आणि त्यानंतर जगभर झाला होता. 
 
 
ब्रिटनमध्ये सापडलेला कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन आता जगभर पसरू लागला आहे. ब्रिटनमधून भारतामध्ये परतलेले काही नागरिक या नव्या स्ट्रेनने संक्रमित झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाचे उत्पतीकेंद्र असणाऱ्या आणि जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यास कारक असणाऱ्या चीनमध्ये सुद्धा कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनने प्रवेश केला आहे. शास्त्रज्ञांच्या मते हा नवा स्ट्रे्नचा विषाणू जुन्या कोरानाच्या विषाणूपेक्षा ४० ते ७० टक्क्यांनी अधिकाधिक संक्रमित होणार आहे. ब्रिटनमध्ये मोठ्या संख्येने या नव्या स्ट्रेनने बाधित असलेले रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आपतकालीन परिस्थितीत ब्रिटन सरकारने आॅक्सफर्ड निर्मित कोरोना लस वापरण्यास परवानगी दिली आहे. 
 
 
चायनामध्ये ब्रिटनमधून परतलेली एक विद्यार्थीनी या नव्या स्ट्रेनमुळे बाधित झाली आहे. ही मुलगी २३ वर्षांची असून ती ब्रिटनवरुन शंघाईला आली होती. १४ तारखेला तिची कोरोना तपासणी करण्यात आली. २४ तारखेला तिच्या शरीरातून घेतलेल्या नमुन्यांमध्ये ”VUI202012/01″ नामक कोरोनाचा नव्या स्ट्रेन आढळून आला. या मुलीला काॅरन्टाईन केंद्रात नेण्यात आले असून तिच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात चीनने ब्रिटनवरुन येणाऱ्या विमानसेवा स्थगित केल्या आहेत. 

Powered By Sangraha 9.0