२०२१ मध्ये होणार आहेत 'हे' महत्वाचे आणि मोठे बदल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2021
Total Views |

2021_1  H x W:

जाणून घ्या तंत्रज्ञान, आरोग्य, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात घडणारे


१. एप्रिलपासून वेतन नियमांमध्ये बदल:
एक एप्रिलपासून नवीन वेतन नियम लागू होणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक भत्ते मिळणार नाहीत. म्हणजे एकूण वेतनातील बेसिक देय आणि एचआरचा भाग ५० टक्के होईल. या बदलामुळे कर्मचाऱ्यांच्या पीएफमध्ये अधिक रक्कम जणार असली तरी प्रत्येक महिन्याला हाती पडणारे वेतन कमी होणार आहे.
२. चेक पेमेंटवर पॉझिटिव्ह पे लागू होणार:
पॉझिटिव्ह पे सिस्टिम २०२१ मध्ये सुरू होणार आहे. ५० हजारांहून अधिक धनादेश पाठवायचा असल्यास बँकेला एसएमएसद्वारे सूचना द्यावी लागणार आहे. तसेच रिजर्व्ह बँकेने १ जानेवारीपासून काँटॅक्टलेस कार्ड पेमेंट्सची मर्यादा २००० हून वाढवत ५,००० हजार केली आहे.

३. चारचाकींना फास्टॅग आवश्यक:
फेब्रुवारीपासून चारचाकी वाहनांना फास्टॅग अनिवार्य करण्यात येणार आहे. अन्यथा दुप्पट पैसे दंड म्हणून द्यावे लागणार आहेत. तसेच इलेक्ट्रॉनिक चीपचे पासपोर्ट दिले जाणारआहेत. ते स्कॅन केल्यावर पासपोर्टधारकाची माहिती स्क्रीनवर येईल व फसवणूक टाळण्याबरोबरच वेळही वाचणार आहे. ही सुविधा प्रायोगिक तत्त्वावर काही ठिकाणी सुरु करण्यात आली आहे.

४. कृत्रिम किडनी येणार:
अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी कृत्रिम किडनी बनवण्यात यश मिळवले आहे. जी किडनीच्या खालील बाजूस लावली जाईल. नलिकेचे एक टोक रक्तवाहिन्यांना, तर दुसरे टोक मूत्राशयाला जोडले जाईल.

५. परीक्षेतील गुण पद्धती बदलेल, जेईई ४ वेळा होणार:
सीबीएसईच्या १० वी आणि १२ वीमध्ये आता १० % गुण केस स्टडीजशी निगडित असतील. प्रश्नांची संख्याही कमी होईल आणि गुण देण्याची पद्धतसुद्धा बदलणार आहे. वर्षात ४ वेळेस जेईई-मेन होईल. २०१९ पर्यंत शाळा आणि वर्ग पारंपरिक होते पण २०२० मध्ये मुले ऑनलाइन पद्धतीने शिक्धन घेत होते. त्यामुळे २०२१ मध्ये या दोन्हीचं ब्लेंडेड पद्धतीचं शिक्षण दिल जाणार आहे.

६. लँडलाइनहून मोबाइल कॉलसाठी आधी ० लावणे आवश्यक व ५ जी नेटवर्क सुरू होण्याची शक्यता :
लँडलाइनहून कोणत्याही मोबाइलवर फोन लावताना यापुढे मूळ नंबरपूर्वी ० लावावा लागणार आहे. २०२१ मध्ये भारतात ५ जी नेटवर्क सुरू होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे अँड्रॉइड ४.०.३ ऑपरेटिंग सिस्टिमपेक्षा आधीच्या अर्थात जुन्या व्हर्जनवर व्हॉट्सअॅप चालणार नाही.

७. सर्वांचे डिजिटल हेल्थ कार्ड, हवामान विभाग वर्तवणार हिवतापाचा अंदाज:
२०२१ मध्ये संपूर्ण देशात हेल्थ कार्ड लागू केले जाणार आहे. हे कार्ड सर्व रुग्णालये आणि दवाखान्यांत उपलब्ध असेल व सर्व रुग्णांचा डाटा सुरक्षित असेल. एका क्लिकवर हा रिपोर्ट केव्हाही आणि कधीही बघता येणार आहे. तर हवामान खाते हिवताप, डेंग्यूसारख्या आजारांचा अंदाज व्यक्त करु शकणार आहे.

८. हिपॅटायटिस-सी आजाराच्याच्या नव्या उपचारांना मंजुरी:
अमेरिकेने युनिव्हर्सल हिपॅटायटिस-सीच्या नवीन उपचारांना मंजुरी दिल्याने हे उपचार आधीच्या उपचारांपेक्षा ९०% अधिक परिणामकारक ठरणार आहेत. घरच्या घरी उपचारांसाठी व्हर्च्युअल रिअॅलिटीसारखे टूल्स २०२१ मध्ये येणार आहेत.

९. स्मार्टफोन कनेक्टेड पेस मेकरचीही तयारी
२०२१ मध्ये स्मार्टफोन कनेक्टेड पेसमेकर आणण्याची तयारी सुरू आहे. यात मोबाइल फोनद्वारे पेसमेकरवर निगराणी ठेवली जाणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@