दशकात मराठी कलाविश्वाला ४०० कोटींचा तोटा !

01 Jan 2021 13:50:48

Marathi_1  H x
 
 
मुंबई : एकीकडे मराठी वाचवण्याची मोहीम सुरु असताना दुसरीकडे मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवण्याचे चित्र एका आकडेवारीवरून समोर आले आहे. ज्येष्ठ पत्रकार नितीन वैद्य यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या माहितीनुसार २००५ ते २०१५ या वर्षात मराठी चित्रपट क्षेत्राला कोट्यावधींचा तोटा सहन करावा लागला आहे. मराठी कलाविश्वाला बसलेला हा आर्थिक फटका चीतेंचा विषय आहे.
 
 
 
 
 
 
 
नितीन वैद्य यांनी फेसबुकवर एक तक्ता शेअर करत मराठी कलाविश्वातील आर्थिक माहिती समोर मांडली आहे. या बाबींनुसार २००५ ते २०१५ या दशकामध्ये मराठी कलाविश्वाला सुमारे ४०० कोटींचा फटका बसला आहे. या आकडेवारीमध्ये मराठी चित्रपट, नाटक, संगीतक्षेत्र आणि लोककलांचा समावेश आहे. यावेळी त्यांनी कलाविश्वातील माध्यमांचे स्वरूप, तसेच समोर उभ्या असलेल्या अडचणी आणि त्यावर काय उपाय आहे, हेदेखील सांगितले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0