कंगानाच्या मुंबईबद्दल वक्तव्यावर दरेकरांनी दिले ‘हे’ उत्तर

    दिनांक  09-Sep-2020 13:21:17
|
Kangna and Pravin Darekar
 
 
 
मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत हिच्याविरोधात भूमीका घेतल्यानंतर सुढ बुद्धी दाखवून केवळ पालिका आणि राज्यातील सत्तेचा वापर करायचा, कंगनाच्या विरोधात म्हणूनच ही कारवाई केली जात आहे हे स्पष्ट दिसत आहे. मुंबई राजरोज पणे बकालपणे उभ्या राहिल्या झोपडपट्ट्या त्यांच्यावर कारवाई होणार नाही, अशी टीका विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर केली आहे.
 
राज्यातील इतर प्रश्नांना बगल देत कंगना विरोधात ज्या प्रकारे कंगना विरोधात महापालिका आघाडीवर कारवाई करत आहे, त्याबद्दल दरेकर यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्या कंगनाबद्दल तुमची प्रतिक्रीया काय असे विचारले असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची जी भूमिका आहे तीच आमचीही आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.