"ऑफिस पुन्हा बनवू पण शिवसेनेची औकात समजली"

    दिनांक  09-Sep-2020 13:45:38
|
Babita phogat_1 &nbs


मुंबई : कंगना रणौतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईविरोधात दंगलगर्ल जगज्जेती कुस्तीपटू बबिता फोगाट हिने आवाज उठवला आहे. आम्ही कार्यालय पुन्हा तयार करू पण यामुळे शिवसेनेची औकात समजली, असा प्रहार तिने शिवसेना नेत्यांवर केला आहे. बबिताने सुरुवातीपासूनच कंगनाच्या पाठीशी उभे राहत तिला कायम पाठींबा दिला आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाला आव्हान देणाऱ्या शिवसेना नेत्यांनाही खडेबोल सुनावले होते. कंगना मुंबईत येणारच जे काहा करायचे ते करा, असा इशारा तिने दिला होता.
 
 
 
जेव्हा गिधाडाचं मरण ओढावतं तेव्हा ती शहराकडे पळतात, हीच गत शिवसेनेची झाली आहे. कंगना रणौत घाबरणारी नाही आहे, संपूर्ण देश तिच्या सोबत आहे. कार्यालय तर पुन्हा बनवू पण एका महिलेविरोधात संपूर्ण यंत्रणा लावणाऱ्या शिवसेनेची औकात समजली, अशा कठोर शब्दात तिने समाचार घेतला आहे. कंगना संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे, असे म्हणत तिने पाठींबा दिला आहे. दरम्यान, कंगना रणौत आज मुंबईत दाखल होणार आहे. तिच्या कार्यालयाविरोधात पाडकाम कारवाई थांबवण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणीही सुरू होणार आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.