'दाऊदच्या फोटोला काळं फासायचा कार्यक्रम लाचार सेनेकडून झालाच नाही'

    दिनांक  09-Sep-2020 10:17:10
|

shivsena_1  H xमुंबई :
अभिनेत्री कंगना रानौत आणि शिवसेना यांच्यातील संघर्षाने राजकीय वळण घेतलं आहे. सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपवर टीका केल्यावर भाजपानेही त्याला प्रत्युत्तर दिले आहे. काही दिवसांपूर्वी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदकडून मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानी धमकीचे फोन आल्याचा हवाला देत भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर खोचक टीका केली आहे.अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, मातोश्री बॉम्बने उडवून द्यायची धमकी मिळाल्यावर कमीत कमी दाऊदच्या फोटोला काळे फासून त्याला चपला मारण्याचा एखादा ब्रम्हांड व्यापी कार्यक्रम लाचार सेनेकडून साजरा व्हायला हवा होता अशा शब्दात त्यांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी कामे करायची ती आम्ही दिवसा-ढवळ्या करतो, रात्रीच्या अंधारात नाही हे विधान करुन अप्रत्यक्षपणे भाजपाला टोला लगावला होता. त्याचा समाचार घेत भातखळकर म्हणतात, "पोस्टमॉर्टेम दिवसाढवळ्या करण्याचा कायदा असतानाही सुशांत सिंहचं शवविच्छेदन मात्र आपल्या राज्यात रात्रीच्या अंधारातच झालं..." असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.