“महाविकास आघाडीच्या मनातच नव्हते मराठा आरक्षण टिकावे”

09 Sep 2020 17:37:03

Vinayak Mete_1  
 
मुंबई : बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर स्थगिती आणली. यावर विरोधी पक्ष नेत्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. यावेळी शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांनी, “महाविकास आघाडीच्या मनातच नव्हते की हे मराठा आरक्षण टिकावे.” अशा शब्दात त्यांनी टीका केली. दरम्यान, मराठा आरक्षण घटनापीठाकडे वर्ग करण्यात आला आहे. यामुळे राज्य सरकार मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवण्यात अपयशी ठरली आहे. हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग करतानाच आरक्षण प्रक्रियेलाही स्थगिती देण्यात आली. अॅडमिशन प्रोसेस आणि नोकऱ्यांबाबत या आरक्षणाचा उपयोग देण्यात येऊ नये असे न्यायालयाने म्हटले आहे.
 
 
शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांनी सांगितले आहे की, “महाराष्ट्रासाठी ही अतिशय वाईट घटना आहे. हे आरक्षण न्यायालयात टिकवण्याचे काम हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारचे होते. मुळात त्यांच्या मनातच नव्हते की हे आरक्षण टिकावे आणि त्यांची ही इच्छा पूर्ण झाली. आम्ही या गोष्टीचा निषेध करतो. जर त्यांना मराठा समाजाबद्दल थोडे जरी प्रेम असेल तर लवकरात लवकर हे आरक्षण टिकवण्यासाठी अध्यादेश काढावा. गरज पडली तर एक दिवसाचे विशेष अधिवेशन घ्यावे, तरच हा मराठा समजा त्यांना माफ करू शकेल. अन्यथा या सरकारला माफ करणार नाही.” असे मत त्यांनी मांडले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0