कोणी घर देता का घर ? ओमर अब्दुल्लांची घरासाठी शोधाशोध

    दिनांक  09-Sep-2020 17:19:08
|

Omer Abdulla_1  
 
 
 
 
जम्मू : जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी सरकारी निवासस्थान सोडण्याची घोषणा केली आहे. तसेच ऑक्टोबर अखेरपासून नव्या घरासाठी शोधाशोध सुरू करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. जम्मू काश्मीरच्या प्रशासकीय सचिवांना पत्र लिहून त्यांनी ही माहिती दिली आङे. श्रीनगरच्या गुपकर रोड येथे उभे असलेले क्रमांक १ जी हे सरकारी निवासस्थान त्यांना २००२ मध्ये खासदार झाल्यानंतर त्यांना देण्यात आले होते. २००८ मध्ये ज्यावेळी ते मुख्यमंत्री झाले त्यावेळी जी-५ मुख्यमंत्री निवास म्हणून त्यांना वर्ग करण्यात आले.
 
 
२०१५ पासून ते याच ठिकाणी राहत आहेत. कमल ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीर व लडाख हे दोन्ही केंद्र शासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले आहेत. त्यामुळेच नव्या नियमांनुसार, ओमर अब्दुलांचे आता या ठिकाणी राहणे हे नियमांमध्ये बसत नाही. अब्दुल्ला यांनी घर खाली करण्यासाठी आठ ते दहा आठवड्यांची मुदत मागितली आहे. कोरोना महामारीच्या काळात नवे घर शोधणे कठीण जात असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
 
 
त्यामुळे नवे घर शोधण्यासाठी वेळ लागत असल्याचेही ते म्हणाले. मला कुठल्याही सरकारी संपत्तीवर कब्जा करायचा नाही, तसेच मला घर रिकामी करण्यासाठी कुठलीही नोटीस आलेली नाही, अशी माहितीही त्यांनी दिली आहे. वडील फारूख अब्दुल्ला, बहिण आणि काकीचे घर हे अब्दुल्ला यांच्या सध्याच्या निवासस्थाना शेजारीच आहेत. अब्दुल्ला त्यांच्या वडिलांकडे रहायला जाणार की शहरात अन्य ठिकाणी घर शोधणार याबद्दल अद्याप माहिती दिलेली नाही. अब्दुल्ला हे गुपकार या ठिकाणी सुरक्षा आणि अन्य दृष्टीने सोयीस्कर अशा जागी ते जातील, अशी अपेक्षा आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.