कंगनाने कोर्टात आव्हान दिल्यानंतर कारवाई स्थगित

    दिनांक  09-Sep-2020 13:01:38
|

Kangna Ranaut _1 &nb


मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत हिने मुंबई महापालिकेच्या कारवाईविरोधात मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यामुळे महापालिका अधिकाऱ्यांना कारवाई स्थगित करावी लागणार आहे. या प्रकरणी अगदी काही वेळातच न्यायालयापुढे सुनावणी होणार आहे. मुंबई महापालिकेच्या वांद्रे पश्चिम येथे पाली हिल रोड येथे कंगना रणौतच्या कार्यालयातील बेकायदा बांधकाम पाडण्यासाठी पालिकेचे पथक बुधवारी सकाळीच दाखल झाले.
 
सोमवारी पालिका अधिकाऱ्यांनी पाहणी करत नोटीस बजावली होती. त्यानंतर कंगनाला यावर उत्तर देण्यासाठी २४ तासांचा अवधी दिला होता. कंगनाच्या घर आणि कार्यालयातील कारवाईसाठी मोठा फौजफाटा बोलवण्यात आला आहे. पालिकेचे पथक कंगनाच्या घराबाहेरील बांधकाम पाडत असल्याची दृश्ये येत आहेत. न्यायालयात काही क्षणांतच कारवाई सुरू केली जाणार आहे. दरम्यान, कंगनाच्या कार्यालयातून पालिका अधिकारी व कर्मचारी रवाना झाले आहेत. कारवाई पूर्ण झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, सुनावणीनंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही म्हटले जात आहे.


 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.