“मी जगेन किंवा मरेन, पण तुमचे पितळ उघडे पाडेन”

    दिनांक  09-Sep-2020 20:32:36
|

Kangana_1  H x
 
मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतच्या मुंबईमध्ये प्रस्थान होताच अनेक ठिकाणी निदर्शने झाली. कोणी तिच्या सोबत उभे राहिले, तर कोणी तिच्या विरोधात. मात्र तरीही तिने ट्विटरवरून टीका करणे काही सोडले नाही. आता तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बॉलीवूड दिग्दर्शक करण जोहर यांचे नाव घेत, ‘तुमचे पितळ उघडे पडेन असा इशाराच दिला आहे. कंगनाच्या मुंबईमध्ये येण्याने मात्र आता महाराष्ट्रातील वातावरण मात्र चांगलेच तापलेले आहे. मुंबई महापालिकेकडून तीचे पाली हिल स्थित कार्यालय तोडण्यात आल्यानंतर नेपोटीझम आणि शिवसेना विरुद्ध कंगना रानौत हा वाद आता चांगलाच वाढणार आहे.
 
 
 
कंगनाने ट्विट केले आहे की, “उद्धव ठाकरे आणि करण जोहर यांच्या गँगने माझे कार्यालय तोडले. या आता माझे घर तोडा, तोंड तोडा. गुपचुपपणे तुम्ही काय करता, हे देशाने पाहावे. मी जगेन किंवा मरेन, मात्र, तुमचे पितळ उघडे पाडणारच.” अशी टीका तिने केली आहे.
  
पुढे “गेल्या २४ तासांमध्ये अचानक माझे कार्यालय अवैध घोषित करण्यात आले. कार्यालयातील फर्निचर व इतर वस्तूंचे त्यांनी पूर्णपणे नुकसान केले. ते पुन्हा माझ्या घरी येतील आणि उरले-सुरले सर्व तोडतील, अशा धमक्या मला येत आहेत. याचा मला आनंद आहे की, फिल्म माफियांच्या आवडत्या मुख्यमंत्र्याविषयीचे माझे मत खरे ठरले.” असेही तिने टि्वटमध्ये म्हटले आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.