कंगनाच्या ऑफिसवरील कारवाईमुळे न्यायालयाचा अवमान !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Sep-2020
Total Views |
Kangna ranaut office_1&nb
 
 
 
 
मुंबई : कोरोना काळात कुठल्याही प्रकारचे बांधकाम पाडू नयेत, कुणालाही बेघर करू नये, असा उच्च न्यायालयाचा आदेश असतानाही कंगना रणौतच्या कार्यालयावर कारवाई झाली कशी, न्यायालयाने यापूर्वीच दिलेल्या आदेशाचा अवमान नाही का, त्याबद्दल अधिकाऱ्यांवर कारवाई का करू नये, असा प्रश्न आता विचारला जात आहे. दरम्यान, कंगना रणौतने बांधकामावरील कारवाईविषयी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर आता कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे.




कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने ३१ ऑगस्ट २०२० रोजी आदेश दिले आहेत. कोरोना काळात बांधकाम पाडू नये, तसेच कोणालाही बेघर करू नये, असे निर्देश देण्यात आले होते. हे आदेश ३० सप्टेंबरपर्यंत कायम राहतील, असेही या आदेशात म्हटले होते. वकील राखी बारोड यांनी या प्रकरणी ट्विट करत सवाल विचारला आहे.
@@AUTHORINFO_V1@@