सेनेच्या इशाऱ्यावर पालिकेचा कारवाईसाठी वापर?:कंगनाला नोटीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Sep-2020
Total Views |

kangna got notice by mcgm



मुंबई :
अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील वादाला सोमवारी नवे वळण मिळाले. मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी कंगनाच्या खार पश्चिम येथील कार्यालयाला भेट देत बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी नोटीस धाडली आहे. या कार्यालयाला आत्ताच नोटीस कशी मिळते, असा प्रश्नही विचारण्यात येत आहे. तर दुसरीकडे कंगनाला नियमाप्रमाणे घरात १४ दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार असल्याचे मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वैयक्तिक लढाईत अशा प्रकारे सरकारी यंत्रणांचा वापर कितपत योग्य आहे, असाही प्रश्न विचारण्यात येत आहे.
 
कंगनाने खार पश्चिम येथील आपल्या कार्यालयात बेकायदेशीर बदल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पालिकेने कंगनाला २४ तासांत उत्तर देण्यास सांगितले आहे. कंगना उत्तर देण्यास अपयशी ठरल्यास बेकायदेशीर बांधकाम पाडले जाणार आहे. दरम्यान, कंगनाने म्हटल्यानुसार ती ९ सप्टेंबर रोजी मुंबईत दाखल होणार आहे. ट्विट करत कंगनाने मुंबईतील कार्यालयात पालिका अधिकाऱ्यांनी घुसून पाहणी केल्याचे म्हटले होते. त्यासंदर्भातील व्हीडिओही पोस्ट केला होता. ऑफिसच्या जागेचे मोजमाप घेऊन उद्या बांधकाम पाडणार असल्याचे सांगितल्याचा दावा कंगनाने केला होता. महापालिकेचे अधिकारी ऑफिसमध्ये आल्याचे काही व्हिडिओ कंगनाने ट्विटरवरुन पोस्ट केले होते.

सोमवारी तीन अधिकारी आणि तीन कर्मचारी असलेसे सहा जणांचे पथक पाली हिलमधील कंगनाच्या कार्यालयात पोहोचले. त्यांनी या संपूर्ण कार्यालयाची पाहणी केली. कंगनाच्या कार्यालयाला लागून असलेल्या इतर बंगल्यांचीही बीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. एकूणच या मार्गावर बांधकाम रस्त्यावर आले आहे का? इतर गोष्टी बेकायदेशीर आहेत का? बांधकामाबाबत काही त्रुटी आहेत का? याचा आढावा बीएमसीच्या पथकाने घेतला. काही ठिकाणी त्यांनी रस्त्याची मापेही घेतली आहेत. यावेळी कंगनाच्या कार्यालयाच्या रंगरंगोटीचे काम सध्या सुरु आहे.



@@AUTHORINFO_V1@@