विधानपरिषद उपसभापती निवडणुक ; भाजपचे उच्च न्यायालयात आव्हान

08 Sep 2020 10:43:40

BJP_1  H x W: 0


मुंबई :
विधानपरिषद उपसभापती पदासाठी आज निवडणूक होणार आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या म्हणजे अखेरच्या दिवशी ही निवडणूक होईल. मात्र ही निवडणूक होऊ नये, यासाठी भाजपने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी ही माहिती दिली.


विधानपरिषदेच्या उपसभापती निवडणुकीला भाजपने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. गोपीचंद पडळकर परिणय फुके, प्रवीण पोटे कोरोना पॉझिटिव्ह असल्याने ते मतदान करु शकत नाहीत. तसेच निवडणुकीला उभे राहू शकत नाहीत. त्यात निवडणुकीची घाई का? असा प्रश्न प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे. यामुळे भाजपने कोर्टात धाव घेत मुंबई उच्च न्यायलायत याचिका दाखल केली आहे. कोरोना काळात निवडणूक घेण्याच्या सभापतींच्या भूमिकेबाबत याचिकेद्वारे प्रश्न उपस्थित केले. भाजपकडून दिग्गज नेते आणि विधानपरिषद आमदार भाई उर्फ विजय गिरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून विद्यमान उपसभापती अर्थात शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे.


“उपसभापती पद एकमताने कारावं, अशी आमचीदेखील भूमिका होती. आता हे अधिवेशन संपल्यानंतर लगेच अधिवेशन नाही. पुढच्या अधिवेशनातही निवडणूक घेता आली असती. पण सदस्यांचा मतदानाचा हक्क जाणीवपूर्वक डावलून अशाप्रकारे लोकशाहीमध्ये निर्णय थोपण्याचं काम हे सरकार करत आहे. आमचंही मत आहे. आमचीदेखील मोठी संख्या आहे. आम्ही देखील निवडणुका घेऊ शकतो. त्यामुळे आम्हीदेखील फॉर्म भरला आहे” अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0