रियाच्या अटकेनंतर ठाकरे सरकार घाबरले असेल : किरीट सोमय्या

    दिनांक  08-Sep-2020 17:21:28
|

Kirit Somaiya_1 &nbs
मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि ड्रग्स कनेक्शन या सगळ्याचा तपास करत असताना आता अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक कण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. एनसीबीने तपास करताना आज दोन दिवसाच्या चौकशीनंतर ही कारवाई करणार आहे. यावर आता अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणांत रियाच्या अटकेनंतर ठाकरे सरकारला भीती वाटत असेल, अशी टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी सीबीआयने लगेच केल्यामुळे गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा आणि मुंबई पोलीस आयुक्तांना घरी पाठवावे, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.
 
 
 
भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, “आज रियाला अटक झाली. त्यामुळे ठाकरे सरकारला आता भीती वाटत असेल. कोणाची चौकशी होणार आणि कोणाला अटक होणार? ठाकरे सरकारने हे प्रकरण ६० दिवस दाबून ठेवले. मात्र, सीबीआयने दोन आठवड्यात याचा तपास करत सुशांतसिंह प्रकरण चौकशी काय असते? ते दाखवून दिले. त्यामुळे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची ताबडतोब हकालपट्टी करावी आणि मुंबई पोलीस आयुक्त यांनाही घरी पाठवावे.” अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.