'ताकद म्हणजे विश्वासघात, सोनिया म्हणजे नवमातोश्री'

08 Sep 2020 10:16:07

atul bhatkhalkar vs sanja


मुंबई :
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना नेते संजय राऊत हा वाद वाढतच आहे. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनाला शिवसेना नेते राऊत यांनी सुनावले. राऊत यांनी शनिवारी एका चॅनेलशी बोलताना कंगनाप्रती अपशब्द उच्चारले. यावरून राऊत यांच्यावर सर्वत्र टीका होत होती.नॉटी अन् बेईमान या शब्दाला मराठी भाषेत हरामखोर म्हंटले जाते. कंगनाही नॉटी गर्ल आहे. तिची वक्तव्ये नेहमी अशाच प्रकारे असतात असं सांगत संजय राऊतांनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. यावरूनच विरोधी पक्ष भाजपने संजय राऊतांना लक्ष्य केले आहे.

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी अनेकदा शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ट्विट करत भातखळकर म्हणतात, 'हरामखोर म्हणजे नॉटी गर्ल या धर्तीवर...ताकद म्हणजे विश्वासघात, सोनिया म्हणजे नवमातोश्री,अस्मिता म्हणजे रिया, शिवसेना म्हणजे हिंदुत्व, राऊत म्हणजे नॉटी बॉय...' असे म्हणत त्यांनी शिवसेना व संजय राऊतांना टोला लगावला. यावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना नाव न घेता टोला लगावला आहे. 'आम्ही विचार केला त्यापेक्षाही जास्त नॉटी आहेत' असे म्हणत राऊतांना अप्रत्यक्ष टोला लगावला.
Powered By Sangraha 9.0