'या तर चोराच्या उलट्या बोंबा मारण्यासारखं...' : भाजप

    दिनांक  08-Sep-2020 12:16:28
|

BJP_1  H x W: 0मुंबई :
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात विधानसभेत हक्कभंगाचा ठराव मांडला असून हा पारित झाल्यास रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोसावी यांच्यावर कारवाई होऊ शकते.यावरून विरोधी पक्ष भाजपने राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढविला आहे. 'कंगना राणावतला हरामखोर म्हणणाऱ्या शिवसेनेने अर्णव गोस्वामी विरुद्ध हक्कभंगाची तक्रार करावी हे चोराच्या उलट्या बोंबा मारण्यासारखं आहे..' असे म्हणत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. ट्विट करत अतुल भातखळकर यांनी सरकारवर हल्ला चढविला. "अर्णव गोस्वामीने मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्यावर भाजप नेत्यांना राग का येत नाही असा खुळा सवाल अनिल परब करतायत. मुख्यमंत्र्यांनी जेव्हा पंतप्रधानांचा अफजलखान, चौकीदार चोर है म्हणून उल्लेख केला तेव्हा यांनी जणू निषेध मोर्चाच काढला होता..." असा खोचक सवाल ही त्यांनी यावेळी केला.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.