'कबीर कला मंच' म्हणजे प्रतिबंधित माओवाद्यांची फ्रंट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Sep-2020
Total Views |

Kabir Kala Manch_1 &
 
मुंबई : कबीर कला मंच म्हणजे दहशतवादी कारवाया करणाऱ्या प्रतिबंधित सिपीआय(एम)ची फ्रंटल संघटना असल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दिली. मंचाची कार्यकर्ता ज्योती जगतापला देखील एल्गार परिषद हिंसाचार प्रकरणी एनआयएकडून अटक करण्यात आली आहे.
 
 
जानेवारी २०१८मध्ये वर्षाची सुरवात महाराष्ट्राने एका भीषण हिंसचाराने आणि कलुषित वातावरणात अनुभवली होती. त्यासाठी कारणीभूत ठरलेल्या पुण्यातील एल्गार परिषद आणि त्या कटातील नक्षलवादी, दहशतवादी सुत्रधारांचा तपास पुणे पोलिसांनी सुरू केला होता. दोन टप्प्यात अटकसत्र राबविण्यात आले. २४ जानेवारी २०२० रोजी हा तपास एनआयए ने ताब्यात घेतला. तपासादरम्यान सागर गोरखे आणि रमेश गायचोर या कबीर कला मंचाच्या कार्यकर्त्यांना सोमवारी एनआयएने ताब्यात घेतल्याचे वृत्त मुंबई तरुण भारतने प्रसिद्ध केले होते. मंगळवारी एनआयएने या बातमीची पुष्टी केली आहे. तसेच सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांच्यासमवेत ज्योती जगतापला देखील अटक करण्यात आल्याची माहिती एनआयए ने दिली आहे. मुंबईतील एनआयए विशेष न्यायालयात तिघांनाही हजर करण्यात आले. न्यायालयाने ११ सप्टेंबर पर्यंत आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
 
 
फ्रंट संघटना म्हणजे दहशतवादी कारवायांना सहाय्यभूत काम करणाऱ्या; परंतू शहरी भागात राहून विविध नावे धारण करून वावरणाऱ्या संघटना असतात. पी. चिदंबरम गृहमंत्री असताना त्यांनी देखील याविषयीची माहिती संसदेला दिली होती. आता राष्ट्रीय तपास यंत्रणा त्यांच्या मुसक्या जोरदार आवळत असल्याचे दिसून येते आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@