'Vi' व्होडाफोन-आयडियाचा नवा लोगो!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Sep-2020
Total Views |
Vodafone_1  H x


व्होडाफोन-आयडिया आता ‘व्होडाफोन इंडिया लिमिटेड’!


मुंबई : विलीनीकरणानंतर जवळपास दोन वर्षांनंतर, व्होडाफोन आयडिया कंपनीने आपले नवीन नाव जाहीर केले आहे. व्होडाफोन आयडिया आता ‘vi’ म्हणून ओळखली जाईल. व्हीआयचे पूर्ण नाव व्होडाफोन इंडिया लिमिटेड आहे. २०१८च्या ऑगस्टमध्ये व्होडाफोन आणि आयडिया विलीनीकरण केले गेले होते, परंतु आतापर्यंत दोन्ही कंपन्या त्यांच्या जुन्याच नावाने चालत होत्या.


नवीन नावाची घोषणा करताना सीईओ रवींद्र ठक्कर म्हणाले, “दोन ब्रँडचे एकत्रिकरण हे जगातील सर्वात मोठे टेलिकॉम एकत्रिकरणाचे उदाहरण आहे. नवी सुरुवात होण्याची वेळ आली आहे.’ या घोषणेच्या अगोदर, आज सकाळी व्होडाफोन आयडियाचा शेअर १०% वाढला आहे. नवीन नावाच्या घोषणेसह, कंपनीने आपल्या शुल्क योजनेत कोणतेही बदल केले नाहीत परंतु भविष्यात किंमती वाढवण्याचे संकेत दिले आहेत.


नुकताच व्होडाफोन इंडिया लिमिटेडला मोठा दिलासा देऊन सुप्रीम कोर्टाने अॅडजस्टर्ड ग्रॉस इन्कम (एजीआर)च्या थकबाकी भरण्यासाठी दहा वर्षांची मुदत दिली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार चालू आर्थिक वर्षात एजीआरपैकी १०% कंपनीला या वर्षात द्यावी लागणार आहे, तर उर्वरित पुढील १० वर्षात १० हप्त्यांमध्ये द्यावी लागणार आहे. व्होडाफोन आयडियावर ५८,००० कोटींपेक्षा जास्त एजीआर आहे. त्यापैकी कंपनीने ७८५४ कोटी रुपये दिले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@