रिया चक्रवती एनसीबी कार्यालयात दाखल!

07 Sep 2020 13:16:10
rhea chakraborty_1 &



सलग दुसऱ्या दिवशी होणार रियाची चौकशी!


मुंबई : सुशांत प्रकरणात ड्रग्ज अँगलचा तपास करणार्‍या नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोची (एनसीबी) टीम आज सलग दुसर्‍या दिवशीही रिया चक्रवर्तीची चौकशी करत आहे. रियाचा भाऊ शौविक, सुशांतचे हाऊस मॅनेजर मिरांडा आणि हेल्पर दिपेश सावंत यांना समोर बसवून तिला प्रश्नोत्तरे केली जाणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, आज रियालाही अटक केली जाऊ शकते आहे.


यापूर्वी रविवारी रियाची सहा तास चौकशी करण्यात आली. रिया उशीरा आल्याने प्रश्नोत्तरे पूर्ण होऊ शकली नाहीत, म्हणून आज पुन्हा तिला बोलावण्यात आले आहे. रिया रविवारी दुपारी १२ वाजता एनसीबी कार्यालयात पोहोचली होती.


दरम्यान, ड्रग पॅडलिंगच्या आरोपावरून एनसीबीने अनुज केसवानीला अटक केली आहे. कैझान इब्राहिमच्या चौकशीदरम्यान त्याचे नाव समोर आले. या प्रकरणात आतापर्यंत ७ जणांना अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे, ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीसाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने एसआयटीची स्थापना केली आहे.


सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रविवारी सकाळी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी)ने रिया चक्रवतीच्या घरी जाऊन तिला समन्स बजावला होता. आज तिची ड्रग्सप्रकरणी चौकशी होऊ शकते. एनसीबी सुशांत केसमध्ये ड्रग्स कनेक्शनचा तपास करत आहे. आतापर्यंत सुशांतचा मदतनीस दीपेश सावंत, अब्दुल बासित, जैद विलात्रा, शौविक चक्रवती, सॅम्युअल मिरांडा आणि अब्बास लखानी या ६ जणांना अटक करण्यात आली आहे. कैझान इब्राहिमला देखील अटक केली होती, मात्र शनिवारी त्याला कोर्टातून जामिन मिळाला.


दरम्यान, एनसीबीने शौविक व मिरांडाला कोर्टात सादर केले. कोर्टाने दोघांना ९ सप्टेंबरपर्यंत एनसीबीच्या ताब्यात सोपवले आहे. अधिकाऱ्यांनी कोर्टाला सांगितले की, दीपेश सावंतला समोरासमोर बसवून शौविक व इतरांच्या चौकशीची गरज आहे. रियाच्या अटकेच्या प्रश्नावर एनसीबी अधिकारी म्हणाले, ड्रग्ज रॅकेटमध्ये आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा तपास सुरू आहे.






Powered By Sangraha 9.0