महाराजांच्या वंशजांकडून पुरावे मागणारे अस्मितेच्या बाता करतात!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Sep-2020
Total Views |
Sanjay Raut_1   
 


मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेले ट्विट त्यांच्यावरच उलटले आहे. अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यातील वादात महापुरुष आणि देवी देवतांची नावे राऊतांनी घेतल्याने जनतेत प्रचंड रोष पाहायला मिळत आहे. हॅशटॅग मुंबा देवी आणि कंगना रणौत या द्वारे ट्विटरवर संजय राऊत यांना नेटीझन्सनी खडेबोल सुनावले आहेत. यापूर्वी भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचीही राऊत यांना आठवण करून दिली आहे.
 
शिवसेना ही हिंदूत्व मानणारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांनी आम्हाला स्त्रियांचा सन्मान कसा करायचा याची शिकवण दिली आहे, पण काही जण आम्ही महिलांचा अपमान करत असल्याचे ढोल बडवत आहेत, शिवसेनेबद्दल चुकीची माहिती पसरवत आहेत, असे करून ते मुंबई नाही तर मुंबा देवीचा अपमान करत आहेत. शिवसेना पूर्वीही स्त्रियांच्या पाठीशी उभी होती आणि पुढेही हा लढा कायम ठेवेल, ही शिकवण आम्हाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे, असे ट्विट संजय राऊत यांनी केले होते. (Netizens ask questions on Sanjay Raut for taking mumba devi name in kangana controversy)
 
मात्र, या प्रकरणात मुंबा देवीचे नाव घेतल्याने मुंबा देवीच्या भक्तांनी राऊतांवर टीका केली आहे. तुमच्यी पक्षाच्या लढ्यामध्ये देवतांची नावे घेऊन कलह का माजवत आहात, असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला आहे. संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्याकडे महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागितले होते, ही आठवणही राऊत यांना करून देण्यात आली आहे. संजय राऊत यांनी कंगनाला विरोध करताना महापुरुषांचे नाव घेऊन सारवासारव करू नये, असेही त्यांना सुनावले आहे.


@@AUTHORINFO_V1@@