मुंबईत येणाऱ्या कंगनाला केंद्रीय गृहमंत्रालयाचे ‘सुरक्षा कवच’!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Sep-2020
Total Views |
Kangna _1  H x


‘Y’दर्जाच्या सुरक्षेसाठी कंगनाने मानले गृहमंत्री अमित शहांचे आभार!


मुंबई : कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर तिने मुंबईत येऊ नये म्हणून अनेकांनी तिला धमकी वजा इशारे दिले आहेत. या सर्व धमक्यांमुळे कंगनाच्या वडिलांनी हिमाचल प्रदेश सरकारकडे तिच्यासाठी पोलिस संरक्षण मागितले होते. आत मात्र कंगनाला केंद्रीय गृहमंत्रालयाने सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कंगना राणावतला ‘Y’ दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर कंगना राणावतने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे जाहीर आभार मानले आहेत.







केंद्राकडून सुरक्षा देण्याच्या निर्णयानंतर कंगनाने देखील ट्वीट करत अमित शाह यांचे आभार मानले आहेत. ती म्हणाली, “आता कोणत्याही देशभक्ताचा आवाज दाबला जाणार नाही हे यावरुन सिद्ध होतंय. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानते. त्यांना वाटलं असतं तर ते मला काही दिवसांनंतर मुंबईत जाण्याचा सल्ला देऊ शकले असते. मात्र, त्यांनी भारताच्या या मुलीचा मान राखला आहे. त्यांनी माझ्या स्वाभिमान आणि आत्मसन्मानाची रक्षा केली आहे. जय हिंद.”


मुंबई आणि मुंबई पोलिसांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर शिवसेनेसह महाराष्ट्रातील अनेक पक्षांनी कंगनावर टीकेची झोड उठवली होती. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी तर कंगनाला मुंबईत आल्यानंतर धडा शिकवण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर वातावरण चांगलंच तणावपूर्ण झालं होतं. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कंगनाला सुरक्षा दिली आहे.




@@AUTHORINFO_V1@@