कौतुकास्पद ! आता हायपरसॉनिक तंत्रज्ञान असलेला भारत जगातील चौथा देश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Sep-2020
Total Views |

Hypersonic_1  H
 
 
नवी दिल्ली : नवनवीन तंत्रज्ञानात भारत प्रगती करत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारताने हायपरसॉनिक टेक्नोलॉजी डेमोनस्ट्रेटर स्वदेशात तयार करण्यात यश मिळवले आहे. हे भारतीय संरक्षण आणि विकास संस्था डीआरडीओचे सर्वात मोठे यश मानले जात आहे. ओडिशातील बालासोर येथील एपीजे अब्दुल कलाम रेंजवर सोमवारी याची यशस्वी चाचणी घेण्यात आली. ही चाचणी स्क्रॅम जेट इंजिनच्या मदतीने लाँच करून घेण्यात आली. याबरोबरच हायपरसॉनिक स्पीड मिळवणारा भारत जगातील चौथा देश बनला. आतापर्यंत हे तंत्रज्ञान केवळ अमेरिका, रशिया आणि चीनकडे होते.
 
 
 
 
 
 
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करून डीआरडीचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, “पंतप्रधानांचे आत्मनिर्भर भारत व्हिजन पूर्ण करणे आणि हे यश मिळवल्याबद्दल डीआरडीओच्या टीमचे अभिनंदन करतो. मी या टीमच्या संशोधकांशी बोललो आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. भारताला त्यांच्यावर अभिमान आहे.” मिळालेल्या माहितीनुसार, भारत येत्या ५ वर्षांमध्ये हायपरसॉनिक मिसाइल तयार करू शकेल. एका सेकंदात दोन किमी अंतर पार करणारे हायपरसॉनिक मिसाइल आवाजापेक्षा ६ पटी अधिक वेगवान असतात. भारतात तयार होणाऱ्या क्षेपणास्त्रांमध्ये स्क्रॅमजेट प्रपल्शन सिस्टिम असणार आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@