एकता कपूरविरोधात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सन्मान आंदोलन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Sep-2020
Total Views |
Vikas Mahatme Ekta Kapoor
 
 
 
मुंबई : पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे नाव ‘व्हर्जिन भास्कर’ वेबसिरीजमध्ये चुकीच्या प्रकारे वापरल्या प्रकरणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजप खासदार डॉ. विकास महात्मे यांनी दिला आहे. या प्रकरणी केंद्रीय प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. या वेबसिरीजमध्ये एका महिला वसतीगृहात सुरू असलेल्या सेक्स सँण्डल दाखवण्यात आले आहे. या वसतीगृहाला देण्यात आलेल्या नावावरून आक्षेप घेण्यात आला आहे. केवळ धनगर समाजच नव्हे तर पुण्यश्लोक अहिल्याबाई यांना मानणाऱ्या सर्व अनुयायांच्या भावना दुखावल्या असून या प्रकरणी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
 

 
 
एकता कपूर हीने या प्रकरणी जाहीर माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. बुधवारी दि. ९ सप्टेंबर रोजी एकता कपूर विरोधात सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या वेबसिरीजचे चित्रिकरण तातडीने थांबवले जावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. पत्रासह या व्हीडओची लिंक आणि फोटोही जोडले आहेत. यापूर्वीही एकता कपूरच्या ‘XXX’ या वेबसिरीजविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. हिंदुस्थानी भाऊ म्हणजेच विश्वास पाठक यांनी या प्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी केली होती.

@@AUTHORINFO_V1@@