कंगनाच्या पालीमधील कार्यालयाची बीएमसीकडून पाहणी!

07 Sep 2020 15:25:48

Kangana Ranaut_1 &nb
 
 
 
मुंबई : कंगना रानौत आणि शिवसेना यांच्यातील वाद चांगलाच गाजत आहे. संजय राऊत आणि कंगना रानौत यांच्या ट्विटरवरील लढाई चालू असतानाच मुंबईतील तिच्या कार्यालयावर मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. यावर कंगना म्हणाली की, “काहीही बेकायदेशीर नसताना आज त्यांनी माझ्या कार्यालयावर धड टाकली, उद्या ते कार्यालय पाडतीलही.” अशी टीका त्यांनी केली आहे.
 
 
 
 
 
कंगनाने ट्विट करत महापालिकेच्या या कारवाईची एक व्हिडियो शेअर करत म्हंटले आहे की, “बीएमसीचे काही अधिकाऱ्यांनी जबरदस्ती माझ्या मुंबईच्या कार्यालयावर कब्जा केला. मोजमाप घेतले आणि शेजाऱ्यांना त्रासही दिला. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची भाषा ‘त्या ज्या तुमच्या मॅडम आहेत, त्यांना कृतीचे परिणाम तर भोगावे लागतील.’ अशी होती.”
 
 
 
 
 
पुढे तिने ट्विटकरत म्हंटले आहे की, “महापालिकेच्या परवानगीचे सर्व कागदपत्रे माझ्याकडे आहेत. माझ्या मालमत्तेत काहीही बेकायदेशीर झालेले नाही. कोणतीही पूर्व सूचना न देता त्यांनी माझ्या घरावर छापा टाकला आहे., उद्या कोणतेही पुरावे नसताना ते माझे कार्यालय पाडतीलही.” या धाडीबद्दल तिने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
 
 
 
 
 
नक्की प्रकरण काय?
 
 
 
सोमवारी तीन अधिकारी आणि तीन कर्मचारी असलेसे सहा जणांचे पथक पाली हिलमधील कंगनाच्या कार्यालयात पोहोचले. त्यांनी या संपूर्ण कार्यालयाची पाहणी केली. कंगनाच्या कार्यालयाला लागून असलेल्या इतर बंगल्यांचीही बीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. एकूणच या मार्गावर बांधकाम रस्त्यावर आले आहे का? इतर गोष्टी बेकायदेशीर आहेत का? बांधकामाबाबत काही त्रुटी आहेत का? याचा आढावा बीएमसीच्या पथकाने घेतला. काही ठिकाणी त्यांनी रस्त्याची मापेही घेतली आहेत. यावेळी कंगनाच्या कार्यालयाच्या रंगरंगोटीचे काम सध्या सुरु आहे. हे काम करणाऱ्या पाच कामगारांचीही बीएमसीच्या पथकाने किरकोळ चौकशी केली. त्यानंतर बीएमसीचे पथक तिथून निघून गेले.
 
 
Powered By Sangraha 9.0