POK पाकिस्तानचा म्हणणाऱ्या लोंढेंची कानउघडणी

    दिनांक  07-Sep-2020 18:07:16
|
Atul Londhe_1  
 
 
मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतवर टीका करताना काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंनी पाकिस्तानचा POK, असा उल्लेख केल्यानंतर भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी त्यांचा समाचार घेतला आहे. बुद्धी गहाण ठेवून विरोध केला की, असे होते. आम्हला एकच POK माहिती आहे, जो भारताचा अविभाज्य हिस्सा आहे. मग हा पाकिस्तानचा POK आला कुठून, असा प्रश्न त्यांनी लोंढे यांना विचारला आहे.

 
अभिनेत्री कंगना रणौतवरून उठलेले रणकंदन आता राजकीय टोलवाटोलवीपर्यंत पोहोचले आहे. तर दुसरीकडे महापालिका अधिकारी कंगनाच्या कार्यालयात पोहोचले आहेत. ज्या प्रमाणे मलिष्काच्या घरात अळ्या सापडल्या होत्या, तशाच अळ्या आता कंगनाच्याही घरी सापडतील, अशी टीका भातखळकर यांनी महापालिका प्रशासनावर केली आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.