रियाची बाजू घेणाऱ्या स्वराला मिळाले चोख प्रत्युत्तर

06 Sep 2020 17:07:15
Reha Swara_1  H


नवी दिल्ली : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोतर्फे रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक याला सुशांत सिंह राजपूत प्रकरणात त्याच्या घरातील कर्मचारी सॅम्युअल मिरांडा यांना अटक केली आहे. रियाचे वडिल इंद्रजीत चक्रवर्ती यांनी या प्रकरणी प्रतिक्रीया दिली आहे. त्यानंतर लिबरल विचारसरणीकडून वारंवार रियाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला जात आहे. रियाचे वडिल निवृत्त सैनिक आहेत, असे म्हणत स्वरा भास्करने सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर तिला नेटीझन्सनी चांगलेच ट्रोल केले.
 
 
रिया चक्रवर्तीने एका वाहिनीला मुलाखत दिल्यानंतर त्या चॅनलवर टीका केली होती. रियाच्या वडिलांनी आम्ही मध्यमवर्गीय आहोत, आम्हाला उद्वस्त केल्याबद्दल देशवासीयांचे आभार, अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली होती. रिया चक्रवर्तीला वाचवण्यासाठी आणि तिची बाजू घेण्यासाठी स्वरा आता का पुढे आली. सुशांतच्या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून आवाज का उठवला नव्हता. तसेच ड्रग्ज प्रकरणात तीन तीन केंद्रीय तपास संस्था ज्या मुलीच्या रडारवर आहेत. ड्रग्ज प्रकरणाशी संबंध उघड झाले आहेत, त्यांचा बचाव कशासाठी असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
 
 
ट्विटरवर स्वरा भास्कर या 'हॅशटॅग'वर स्वरा भास्कराला प्रश्न विचारण्यात आले आहेत. 'सस्ती शायरी करो सस्ते नशे नही', असे ट्विट तीने काही दिवसांपूर्वी केले होते, त्याची आठवण स्वरा भास्करला करुन देण्यात आली होती. स्वरा भास्करच्या नजरेत ज्या सुशांतच्या वडिलांनी त्यांचा मुलगा गमावला ते पीडित नाहीत, रिया चक्रवर्ती पीडित आहे,
 
 
रिया चक्रवर्ती प्रकरणात बॉलीवुडच्या १४ बड्या नावांची पोलखोल होण्याची शक्यता आहे. ज्यात ड्रग्ज देवाणघेवाण झाली होती. एनसीबीच्या कारवाईपासून कोण घाबरत आहे, असा प्रश्नही स्वराला विचारण्यात आला आहे. लाखो रुपयांच्या गैरव्यवहाराचे हे प्रकरण आहे तर मग हे मध्यमवर्गीय कसे, असाही प्रश्न विचारला जात आहे. देशाने रिया चक्रवर्ती आणि परिवाराला या संकटात ढकलल्याचा आरोप वडिलांनी केला आहे, त्यांची बाजू का घेता, असाह प्रश्न स्वराला विचारण्यात आला आहे. देशभक्तीशी या प्रकरणाला जोडण्याची गरज का वाटत आहे.
Powered By Sangraha 9.0