'मराठी'ला 'अभिजात' दर्जा द्या!; गोपाळ शेट्टींचा केंद्राकडे पाठपुरावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Sep-2020
Total Views |

Gopal Shetty_1  
 


मुंबई : सध्या राज्यात मराठी भाषा आणि अस्मिता यावरून वादंग सुरू असल्याचे चित्र आहे. मात्र, भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी खासदार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty)यांनी केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल (Pralhad Singh Patel) यांना पत्र लिहिले आहे.
 
 
 
यामुळे राज्यभरातील मराठी भाषिकांनी त्यांना पाठींबा दर्शवला आहे. गोपाळ शेट्टी मराठी भाषेसाठी सतत पाठपुरावा करत असल्याबद्दल त्यांच्या कामाचे कौतूकही केले आहे. लिहीलेल्या पत्रात गोपाळ शेट्टींनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा त्वरित निर्णय घ्यावा, अशी विनंती केली आहे.
 
 
 
महाराष्ट्रात सध्या मराठी अस्मितेवरून शिवसेना आणि कंगना रणौत यांच्यात वाकयुद्ध सुरू आहे. कंगना रणौत हिने सुशांत सिंह राजपूत प्रकरणात पोलीसांवर ठाकरे सरकारने दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. तसेच मुंबई, अशा सरकारमुळे पाकव्याप्त काश्मीर होत असल्याचा आरोप तिने केला होता. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आणला. दरम्यान, मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी भूमिका घेतली होती. त्यानंतर २०१९ मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून लवकरात लवकर मागणी केली होती.
@@AUTHORINFO_V1@@