कोरोना लस चीनी गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर!

    दिनांक  06-Sep-2020 15:13:48
|

Corona Vaccine _1 &n
 


वॉशिंग्टन : अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी चीन व रशिया कोरोना लसीच्या (Corona Vaccine) संशोधनाची माहिती चोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत, असा दावा केला आहे. अमेरिकेत फायझरसह अन्य कंपन्या लस शोधण्याची तयारी करत आहे. नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठाशिवाय अन्य कित्येक उच्च तंत्रज्ञान असलेल्या लॅब्समध्ये याबद्दल संशोधन सुरू आहे. दरम्यान ब्रिटनच्या इंटलिजन्स एजन्सीने फायबर ऑप्टीक्स केबलच्या निरिक्षणानंतर हा खुलासा केला आहे. ईराणही या चोरीत सामील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. (corona vaccine data theft allegations by us on china and russia) 
 
 
 
कोरोना लसीच्या निर्मितीमुळे आता विकसित देशांमध्ये स्पर्धा सुरू आहे. इतर देश आपल्या पुढे निघून तर जाणार नाहीत ना ही चिंता प्रत्येकाला सतावत आहे. यासाठीच गुप्तचर यंत्रणांना कामाला लावले जात आहे. अमेरिकेनेही लस निर्मितीचा डेटा चोरी जाणार नाही, यासाठी योग्य ती खबरदारी घेतली आहे. 'नाटो' या संस्थेचे इंटेलिजन्स नेटवर्कही यामुळे कामाला लागले आहे.
 
 
 
चीन काय करत आहे ?
 
अमेरिकेच्या न्यायिक विभागाचे अधिकारी जॉर्न डिमर्स (John Dimmers) यांनी गेल्या आठवड्यात दिलेल्या माहितीनुसार, 'ज्या डेटाची चोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, तो आर्थिक आणि सैन्याच्या दृष्टीने महत्वाचा मानला जात आहे. आम्ही जाणतो की हे काम कोण करत आहे. ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्व आर्थिक नाड्या आवळल्या आहेत. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटना आता चीनच्या हातचे बाहुले बनले आहे. चीनच्या या खेळीची माहिती मार्च महिन्यातच मिळाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या या कारनाम्यात चीनही सामील आहे.', असा आरोप त्यांनी केला आहे.
 
 
प्रत्येक प्रयत्न निःफळ ठरेल
 
एफबीआयने (FBI चीनच्या आत्तापर्यंतच्या सर्व प्रयत्नांना हाणून पाडले आहे. युएनसी प्रवक्त्या लेस्टली मिंटन यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते कि, गुप्तचर यंत्रणा आम्हाला धोक्याच्यावेळी सावध करतात. आम्ही सर्व बायोटेक्नोलॉजी लॅब्सना याबद्दल माहिती देत असतो. अशा कटात तिथली सरकारेही सामील आहेत, असेही ते म्हणाले. रशियाच्या कारवाईबद्दलही त्यांना सावध करण्यात आले होते.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.