एक नारी शिवसेना पर भारी... !

    दिनांक  06-Sep-2020 23:39:26
|

shivsena_1  H x


मुंबई :
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना नेते संजय राऊत हा वाद वाढतच आहे. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनाला शिवसेना नेते राऊत यांनी सुनावले. त्याला कंगनानंही चोख प्रत्युत्तर दिल्यानं हा वाद आणखी वाढला. त्यात राऊत यांनी शनिवारी एका चॅनेलशी बोलताना कंगनाप्रती अपशब्द उच्चारले आणि कंगनानं एक व्हिडीओ पोस्ट करून त्याला प्रत्युत्तर दिलं. यावेळी कंगनानं राऊत यांच्यावर टीकेचा भडीमार केला. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला लक्ष्य केले.

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणावरून त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. ते म्हणतात, कंगनाला विरोध फक्त रिया चक्रवर्तीच्या बचावासाठी आहे हे काळण्याइतका मराठी माणूस दूधखुळा नाही. ही बाई शिवसेनेला जड जाते आहे हे कार्यकारींच्या शिवराळ भाषेवरून स्पष्ट आहे. एका बाईला बेटकुळ्या दाखवण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे. मर्दपणाचा नवा अविष्कार. शिवसेनेच्या तोंडाळ नेत्यांना उघड आव्हान दिलंय या महिलेने. जिने बॉलीवूडच्या इस्लामी माफियांना भीक घातली नाही, ती नवं बाटग्या सेक्युलर शिवसेने समोर झुकेल काय? दाऊदला दम देण्याच्या बाता मारणारे आपले शौर्य एका बाईला दाखवतायत." असा टोलाही त्यांनी राऊतांना लगावला. कंगनावर टीका करणे राऊतांनी आता सोडावे असेही ते यावेळी म्हणाले. "खानावळी विरुद्ध लढणाऱ्या कंगनाचा विचार तूर्तास सोडा,'अटक झालीत तर गॉड फादरना सोडणार नाही', अशी अशी धमकी रियाने दिली आहे, त्याचा गंभीरपणे विचार करा. बुडाला आग लागलेली असताना, दुसऱ्याच्या घराला आग लावण्याचा विचार करणे शहाणपणा नाही." असे म्हणत त्यांनी संजय राऊतांना खडे बोल सुनावले.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.