अधिवेशनात सरकारला महत्वाच्या विषयांवर जाब विचारणार : प्रवीण दरेकर

06 Sep 2020 19:16:36


pravin darekar_1 &nb



मुंबई :
आम्ही फक्त सरकारला कोंडीत पकडणार नाही तर मार्गदर्शक सूचना देऊन चुकी दुरुस्त करण्याची मागणी करणार आहोत. अजूनही सरकार अधिवेशन कसं घेणार याबाबत स्पष्टता नाहीय. चहापान नाही, माध्यमांना सामोरे जात नाहीत. याउलट सुशांत सिंग राजपूत प्रकरणातून ड्रग्स आणि सेक्स रॅकेट, कंगनाबाबतची सरकारची भूमिका या सर्व विषयांमुळे कोविडवरचा फोकस शिफ्ट करण्याचा सरकारचा प्रयत्न दिसतोय. अपयश झाकण्यासाठी इतर भावनिक विषयांकडे लक्ष वळवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर केला आहे.


राज्याचे पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. यासाठी सरकारला विविध विषयांवर घेरण्यासाठी विरोधी पक्षाने जोरदार तयारी केल्याचे दिसून येत आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यासंदर्भात पक्षाची भूमिका माध्यमांसमोर मांडली. कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचाराची अनेक उदाहरणे आहेत. क्वॉरंटाईन सेंटरमध्ये महिलांवर अतिप्रसंग ओढावलेत, अत्याचार झाला आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी मिळून मुख्यमंत्र्यांना २५०पत्रं पाठवून सूचना केल्या मात्र दुर्दैवाने यातील एकही पत्राला उत्तर मिळाले नाही. उद्यापासून सुरू होणारं अधिवेशन अल्पमुदतीचं असलं तरी जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळात सरकारला महत्वाच्या विषयांवर जाब विचारण्याचं काम विरोधी पक्ष करणार असल्याचं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले.
Powered By Sangraha 9.0