रिया चक्रवर्तीला कुठल्याही क्षणी अटक?

    दिनांक  06-Sep-2020 11:33:42
|
Reha _1  H x W:


मुंबई : रिया चक्रवर्तीला एनसीबी कार्यालयाकडून समन्स बजावण्यात आल्यानंतर आता तिला कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रियाच्या वकीलांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे तिच्या अटकेचे भाकीत व्यक्त केले जात आहे. रियाचे वकिल सतीश मानेशिंदे यांनी त्यांची अशील अटकेसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. तसेच अग्रीम जामीनासाठी अर्जही आपण करणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
 
 
रिया सकाळी एनसीबीच्या कार्यालयात निघाली आहे. तिला ड्रग्जच्या संभाषण प्रकरणी समन्स बजावण्यात आले आहेत. वकील मानेशिंदे म्हणतात, जर प्रेम करणे गुन्हा असेल तर रिया अटकेसाठी तयार आहे. रियाची सध्या ड्रग्ज प्रकरणात चौकशी सुरू आहे. रियाचा भाऊ शौविकला अटक झाल्यावर त्याच्या वडिलांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. एका मध्यमवर्गीय कुटूंबाला देशाने बरबाद केल्याबद्दल अभिनंदन, असे ट्विट त्यांनी केले आहे. सुशांतला ड्रग्ज कोण देत होते याबद्दल सध्या एनसीबी चौकशी करत आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.