'दाऊद पण म्हणत असेल हाच मुख्यमंत्री पाहिजे'

06 Sep 2020 17:46:14

rane_1  H x W:



मुंबई :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री निवास्थानावर दुबई वरून अज्ञात व्यक्तीने फोन करून ही धमकी देण्यात आल्याचे कळते. मात्र याबाबत सांगताना मंत्री अनिल परब यांनी निनावी फोन आले मात्र अशी कोणतीही धमकी मिळाली नसल्याचे स्पष्ट केले. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ट्विट करत राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.





ते म्हणतात, "आता नवीन नाटक. अपयश आणि अपराध लपवण्याचा अजून एक प्रकार. आज मातोश्रीमध्ये राहणाऱ्या एका ही व्यक्तीवर एकही केस नाही आणि ना ह्यांची दाऊदच्या विरोधात मोहीम, मग धमकी का येईल? मग सांगणार आंगवर आले आम्ही उडवून दिले पण खरं कोणही आलेलाच नसतो. उलट दाऊद म्हणत असेल हाच मुख्यमंत्री पाहिजे." असे म्हणत असतानाच "मातोश्रीवर मंत्र्यांचे फोन उचलत नाही अन दाऊदचा लगेच उचलला?" असा सवाल करत त्यांनी टोला लगावला.

निनावी फोन आल्यानंतर मातोश्री निवासस्थानाबाहेर पोलीस सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी या घटनेची माहिती घेतली असून पुढील सूचना दिल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री काही कामानिमित्त घराबाहेर पडले आहेत. मातोश्री मध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती आणि वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे. निवासस्थानाबाहेर पोलीस व्हॅन देखील तैनात करण्यात आली असून अजून पोलीस कुमक बोलवण्यात येणार आहे. सध्या सायबर पोलीस या फोन कॉल्सची तपास करत आहे. आता हा फोन दाऊदच्या गँगकडून आला आहे की अन्य कोणी खोडसाळपणा केला? याचाही तपास केला जात आहे.
Powered By Sangraha 9.0